ETV Bharat / state

Eknath Khadse on Shinde government : शिंदे सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, सरकार कधीही कोसळू शकते - एकनाथ खडसे - CM Eknath Shinde

राज्यातील शिंदे सरकार कधीही कोसळू शकते असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले ( Eknath Khadse on Shinde government ) आहे. राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात ( Cases related Shinde government in SC ) असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

MLA Eknath Khadse
आमदार एकनाथ खडसे
author img

By

Published : Jul 30, 2022, 10:19 AM IST

जळगाव - राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते ( Shinde government can collapse any time ), असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले ( NCP MLA Eknath Khadse opinion ) आहे.

आमदार एकनाथ खडसे

सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल - या संदर्भात येत्या १ तारखेला निर्णय आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्वाचा आहे. त्या १६ आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यातरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकते, असे खडसे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट - एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीदरम्यान सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )होते. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव होते. परंतू सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी एकनाथ खडसे यांच्या नावाला विरोध केला होता. त्याचबरोबर १२ आमदारांची नियुक्ती बऱ्याच वर्षापासून रखडली होती. परंतु विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये एकनाथ खडसे यांची वर्णी लागल्याने आता ते परिषदेचे आमदार झाले आहेत.

हेही वाचा -Koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर आर्थिक राजधानीची ओळख मिटेल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.