ETV Bharat / state

तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाची आत्महत्या - जळगाव आत्महत्या बातमी

निलेश सोमनाथ हिरे (वय २६, रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

jalgaon crime
तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : May 27, 2020, 9:34 AM IST

जळगाव - तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका तरुणाने सोमवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. निलेश सोमनाथ हिरे (वय २६, रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

निलेशचे आई-वडील, भाऊ हे गिरणा पंपींग रोड परिसरात राहतात. निलेश याचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. यानंतर तो पत्नीसह अनुराग स्टेट बँक कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होता. पती-पत्नी नियमितपणे सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते. मध्यरात्री निलेश याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी पत्नीने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली. त्यानंतर शेजारील नागरिकांनी धाव घेतली. ही घटना कळल्यानंतर कुटुंबासह नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला. या घटनेची खबर मृत निलेशचा भाऊ मनोज याने रामानंदनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसानी घटनास्थळी धाव घेत निलेश याला शासकीय रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

कुटुंबीयांचा प्रचंड आक्रोश

तीन महिन्यांपूर्वीच निलेशचे लग्न झाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. अशात त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला. कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.