ETV Bharat / state

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या - जळगाव न्यूज

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री जळगाव शहरातील खोटेनगर स्टॉप परिसरातील एका सदनिकेत घडली. संदीप धर्मराज निरखे (वय 35, मूळ रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Suicide of a young man by jumping from the fifth floor of a building in jalgaon
इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Jul 15, 2020, 4:55 PM IST

जळगाव - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री जळगाव शहरातील खोटेनगर स्टॉप परिसरातील एका सदनिकेत घडली. संदीप धर्मराज निरखे (वय 35, मूळ रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संदीप हा फेब्रिकेशनचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो खोटेनगर स्टॉप परिसरातील एका सदनिकेत वास्तव्याला होता. मंगळवारी रात्री त्याने सदनिकेच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केली. संदीपच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेमागे कौटुंबीक वादाचे किंवा व्यवसायाशी निगडित एखाद्या गोष्टीचे कारण असावे, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.