ETV Bharat / state

Bike Trolly Journey : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून शिक्षकाने शोधला भन्नाट उपाय - Bike Trolly Journey

सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील टेहू येथील शिक्षक एम.व्ही.पाटील ( Teacher MV Patil ) यांनी या समस्येवर उपाय शोधत, विद्यार्थ्यांचा शाळा आणि कॉलेजला जाण्याचा मार्ग सुकर केला.

Bike Trolly
Bike Trolly
author img

By

Published : Apr 7, 2022, 11:00 PM IST

जळगाव: दोन वर्ष कोरोनामुळे बसेस बंद होत्या, त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस बंद आहेत. या बंदमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर जळगावातील टेहू येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षक असणारे एम.व्ही.पाटील यांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळा आणि कॉलेजला जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून शिक्षकाने शोधला भन्नाट उपाय

अशी सुचली संकल्पना - जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टेहू ( Tehu in Parola taluka ) या गावात राहणारे शिक्षक एम. व्ही. पाटील यांनी आपल्याकडील मोटारसायकलला ट्रॉली जोडत, त्यांनी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर केली आहे. बसेस बंद असल्यामुळे शहरी भागात शिक्षणासाठी रोज ये-जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या पालकांकडे खासगी वाहन आहे, ते आपल्या पाल्यांना शाळेत नियमित पाठविण्याचा प्रयत्न करीत असतात. काही शिक्षणप्रेमी मात्र अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे टेहू, ता. पारोळा येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील हे आहेत.

ट्रॉली ओढू शकते दहा क्विंटल वजन - पाटील हे दगडीसबगव्हाण ते टेहू ( Dagdisbagvhan te tehu ) येथे रोज मोटारसायकलने जात असतात. अगोदर कोरोना महामारीमुळे व आता एसटीचा बेमुदत संप यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्याकडेला उभे असतात. ते पाहून पाटील यांच्यातला शिक्षक जागा झाला. त्यांनी 10 क्विंटल वजन ओढू शकेल, अशी चार टायरची ट्रॉलीच बनविली आणि ती आपल्या मोटारसायकलला जोडली. शाळा उघडल्यापासून ते रोज 10 ते 12 विद्यार्थ्यांना या ट्रॉलीत बसवून पारोळा येथे शिकवणी व शाळेच्या कामासाठी ( Bike Trolly Journey )सोडतात. तसेच संध्याकाळी परत जाताना देखील त्यांना परतीच्या प्रवासातही मदत करतात.

शिक्षण घेणे झाले सोपे - दगडीसबगव्हाण गाव हे पारोळा धरणगाव रस्त्यावर राजवड रस्त्यापासून 5 किमी आतमध्ये आहे. विद्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी पाटील यांनी बनवलेल्या ट्रॉलीत बसून शिक्षणाची वाट धरत ( Students travel by trolley ) आहे. म्हणून विद्यार्थ्यांना आता बसची किंवा इतर वाहनाची वाट पाहावी लागत नाही. तसेच ते आता वेळेवर आयटीआय, कॉलेज आणि शाळेमध्ये पोहाेचतात.

दररोज दहा ते बारा विद्यार्थ्यांची ने-आण - टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील यांना वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसायचे, ते पाहून पाटील यांना कल्पना सुचली आणि त्यांनी 10 क्विंटल वजन ओढू शकेल अशी चार टायरची ट्रॉली बनविली. तसेच ती मोटारसायकलला जोडली. शाळा उघडल्यापासून ते रोज 10 ते 12 विद्यार्थ्यांना या ट्रॉलीत बसवून पारोळा येथे शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी जाताना त्यांना परत घेऊन जातात. दगडीसबगव्हाण गाव हे पारोळा-धरणगाव रस्त्यावर 5 किमी आतमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड असते. या स्थितीत पाटील यांनी बनवलेली ट्रॉली त्यांना शिक्षणासाठी वरदान ठरली आहे.

हे आहे ट्रॉलीचे वैशिष्ट्य - या ट्रॉलीत एकाच वेळी 10 ते 11 विद्यार्थी ट्रॉलीत सहज बसू शकतात. तसेच शेतकऱ्यांना सामान घेऊन जाण्यासाठी ही ट्रॉली उपयुक्त ठरू शकते. भंगारातील टाकाऊ वस्तुतून ही ट्रॉली साकारली आहे. या ट्रॉलीला बनवायला 16000 रुपये इतका खर्च आला आहे.

हेही वाचा - Death Of a Farmer : कडक उन्हात बकऱ्या चारुन आलेल्या शेतमजूराचा अचानक मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.