ETV Bharat / state

जळगावात अवतरली कृषी पंढरी; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला प्रारंभ - jalgao news

शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन प्रणाली, उती संवर्धन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

अ‍ॅग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
author img

By

Published : Nov 16, 2019, 3:37 AM IST

जळगाव - शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे तंत्र व प्रयोगशील कृषी व्यवस्थेची विविधांगी पद्धतीने गाथा सांगणाऱ्या 'अ‍ॅग्रोवर्ल्ड'च्या राज्यस्तरीय कृषी, दुग्ध व पशू प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 4 एकरावर मांडणी, प्रात्यक्षिकांवर भर, धान्य महोत्सव ही प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये असल्याने जळगावात जणू काही कृषी पंढरीच अवतरली आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन प्रणाली, उती संवर्धन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. शेतकर्‍यांना शासकीय योजनांच्या माहितीसह बँकांची कर्ज प्रक्रिया, पशुपालकांसाठी हिरव्या चार्‍याचे व्यवस्थापन तसेच दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर ठरणार्‍या मुरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अ‍ॅझोलाची प्रात्यक्षिकाचीही मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलिहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, शेततळ्यातील मोती संवर्धन, गांडूळ शेती अशा बाबी देखील प्रदर्शनस्थळी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची ओळख होण्यास या प्रदर्शनाचा लाभ तर होतोच; शिवाय शेतकरी, कृषी निविष्ठा उत्पादित करणाऱ्या कंपन्या आणि शासनाच्या विविध विभागांचा एकमेकांशी समन्वय साधण्यास देखील हातभार लागतो.
हेही वाचा - 'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'

'अ‍ॅग्रोवर्ल्ड'च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मालिकेतील हे पाचवे प्रदर्शन आहे. यंदाच्या ओल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आधुनिक शेतीचे तंत्र प्रात्यक्षिकांसह समजण्यास या प्रदर्शनाचा लाभ शेतकर्‍यांना होईल. त्याचप्रमाणे बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीतील उपायांवर मंथनही घडवून आणण्याचा अ‍ॅग्रोवर्ल्डचा हा छोटेखानी प्रयत्न आहे.

जळगाव जिल्ह्यासह शेजारील धुळे, नंदुरबार, बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी देखील या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत आहेत. प्रदर्शनस्थळीच धान्य महोत्सव भरविण्यात आला असल्याने चोखंदळ ग्राहकांना थेट खरेदीची संधी उपलब्ध आहे.

हेही वाचा - 'राफेल'ची सीबीआय आणि संसदीय समितीकडून चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

Intro:जळगाव
शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे तंत्र व प्रयोगशील कृषी व्यवस्थेची विविधांगी पद्धतीने गाथा सांगणाऱ्या 'अ‍ॅग्रोवर्ल्ड'च्या राज्यस्तरीय कृषी, दुग्ध व पशू प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 4 एकरावर मांडणी, प्रात्यक्षिकांवर भर, धान्य महोत्सव ही प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये असल्याने जळगावात जणू काही कृषी पंढरीच अवतरली आहे.Body:शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन प्रणाली, उती संवर्धन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. शेतकर्‍यांना शासकीय योजनांच्या माहितीसह बँकांची कर्ज प्रक्रिया, पशुपालकांसाठी हिरव्या चार्‍याचे व्यवस्थापन तसेच दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर ठरणार्‍या मुरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अ‍ॅझोलाची प्रात्यक्षिकाचीही मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलिहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, शेततळ्यातील मोती संवर्धन, गांडूळ शेती अशा बाबी देखील प्रदर्शनस्थळी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची ओळख होण्यास या प्रदर्शनाचा लाभ तर होतोच; शिवाय शेतकरी, कृषी निविष्ठा उत्पादित करणाऱ्या कंपन्या आणि शासनाच्या विविध विभागांचा एकमेकांशी समन्वय साधण्यास देखील हातभार लागतो.

'अ‍ॅग्रोवर्ल्ड'च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मालिकेतील हे पाचवे प्रदर्शन आहे. यंदाच्या ओल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आधुनिक शेतीचे तंत्र प्रात्यक्षिकांसह समजण्यास या प्रदर्शनाचा लाभ शेतकर्‍यांना होईल. त्याचप्रमाणे बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीतील उपायांवर मंथनही घडवून आणण्याचा अ‍ॅग्रोवर्ल्डचा हा छोटेखानी प्रयत्न आहे.Conclusion:जळगाव जिल्ह्यासह शेजारील धुळे, नंदुरबार, बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी देखील या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत आहेत. प्रदर्शनस्थळीच धान्य महोत्सव भरविण्यात आला असल्याने चोखंदळ ग्राहकांना थेट खरेदीची संधी उपलब्ध आहे.

बाईट: डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (पांढरा शर्ट)
शैलेंद्र चव्हाण, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक (काळ्या ठिपक्यांचा शर्ट)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.