ETV Bharat / state

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष - जळगाव महापालिका बातमी

महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 6, 2021, 8:38 PM IST

Updated : Mar 6, 2021, 8:54 PM IST

जळगाव - महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्याची घोषणा करत सत्ताधारी भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असले तरी सांगलीच्या धर्तीवर शिवसेना आपल्या नाराज नगरसेवकांना हाताशी धरून काहीतरी करिष्मा करू शकते, हा धोका ओळखून भाजपही सावध पावले टाकत आहे. येत्या आठवडाभरात या निवडणुकीच्या अनुषंगाने काय राजकीय घडामोडी घडतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ 17 मार्चला संपणार आहे. त्यामुळे नवीन महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 18 रोजी या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. 9 ते 16 मार्च दरम्यान निवडणुकीचे अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महापालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणे बदलली आहेत. दोन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे उठबस वाढली आहे.

भाजपच्या गोटात वाढली अंतर्गत गटबाजी

महापौर व उपमहापौर पदावरून भाजपात अंतर्गत गटबाजी वाढली आहे. या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेणारे भाजपचे नेते माजीमंत्री गिरीश महाजन हे विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या जळगावच्या बाहेर आहेत. तर शहराचे आमदार सुरेश भोळे हे कोरोनाबाधित झाल्याने मुंबईत उपचार घेत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अजून महापौर व उपमहापौर पदाच्या नावांबाबत एकमत झालेले नाही. महापौर पदासाठी भाजपत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी पक्षातील जुने कार्यकर्ते व नव्याने पक्षात दाखल झालेल्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपतील एक गट विद्यमान महापौर भारती सोनवणे यांच्या मुदतवाढीसाठी प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत भाजपातील गटबाजीचा फायदा शिवसेनेकडून करून घेतला जातो का? याकडे लक्ष आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये अधिक आहे. महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे महिला नगरसेविकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे, दीपमाला काळे, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. दुसरीकडे, विद्यमान महापौर भारती सोनवणे या देखील मुदत वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. उपमहापौर पदासाठीही भाजपत मोर्चेबांधणी सुरू आहे. या पदासाठी भगत बालाणी, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, धिरज सोनवणे यांची नावे आघाडीवर आहेत. यातील अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली इच्छा देखील बोलून दाखवली आहे.

हेही वाचा - चिंताजनक: जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी 772 नवे कोरोनाबाधित!

शिवसेना चमत्कार घडवणार?

महापालिकेतील 75 नगरसेवकांपैकी 57 नगरसेवक भाजपकडे असून, 15 नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. 3 नगरसेवक एमआयएमचे आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजपचे महापालिकेत स्पष्ट बहुमत आहे. परंतु, गेल्या अडीच वर्षांच्या काळात पक्षश्रेष्ठींकडून मिळणारी सापत्न वागणूक तसेच वेळोवेळी होणारा दुजाभाव, या कारणांमुळे भाजपत नाराज असलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे नाराज नगरसेवक गळाला लावून चमत्कार करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. यासाठी 'सांगली पॅटर्न' वापरला जाऊ शकतो. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी खडसेंनी जळगाव महापालिकेत लक्ष घातले होते. महापौर पदाच्या निवडणुकीच्या रुपाने खडसे गिरीश महाजनांवर चाल करण्याची शक्यता आहे. सांगलीत जे घडले; ते जळगावातही घडू शकते. या अनुषंगाने शिवसेना देखील प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई असणार आहे.

स्पष्ट बहुमत ही भाजपची जमेची बाजू

महापालिकेत 57 नगरसेवकांसह भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. याशिवाय गेल्या अडीच वर्षांच्या काळात केलेली विकासकामे, महापालिकेवरील कमी केलेला कर्जाचा डोंगर तसेच कोरोना काळात महापौरांनी केलेली जनहिताची कामे, या बाबी लक्षात घेऊन महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड राहील, असा आत्मविश्वास आम्हाला आहे, असे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. गेल्या अडीच वर्षांच्या काळातील कामांचा विचार करून शिवसेनेने ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून भाजपसोबत राहावे, जेणेकरून शहराचा सर्वांगीण विकास घडवता येऊ शकतो, असेही दीपक सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाचे जळगावात छापे

शिवसेनेकडून चाचपणी सुरू

या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडताना शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा यापूर्वीच आमचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली आहे. कालच या विषयासंदर्भात मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी निर्णय घेण्याची जबाबदारी त्रिसदस्यीय समितीवर सोपविण्यात आली आहे. या समितीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांचा समावेश असणार आहे. ही समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काही दिवसात चाचपणी करून उमेदवारांची नावे जाहीर करेल. भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ऐनवेळी खेळी करून महापौर व उपमहापौर पदावर विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात स्पष्ट बहुमत असताना देखील भाजपकडून जळगाव शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. आजही अनेक मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना मिळत नाही. महत्त्वपूर्ण प्रश्न प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेत सत्तांतर व्हावे, ही जनमानसाची इच्छा आहे. मात्र, राजकारणात आकड्यांचा खेळ महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन आम्ही चाचपणी करत आहोत, असेही सुनील महाजन यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - जळगाव: किनगाव अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २८ लाखाची मदत

Last Updated : Mar 6, 2021, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.