ETV Bharat / state

गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडिलांप्रमाणे शिक्षक माझ्या गुरुस्थानी ' - डॉ. पंजाबराव उगले - जळगाव पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले विशेष संवाद

आई-वडिलांप्रमाणे शिक्षकांचा देखील आपल्या आयुष्यात गुरू म्हणून मोठा वाटा असतो. या गुरूंनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दाखवलेली वाट, शिकवण यामुळेच आपण आयुष्यात यशस्वी होत असतो. माझ्या आयुष्यात आई-वडिलांप्रमाणे माझे शिक्षक गुरुस्थानी आहेत. त्यांच्यामुळेच मी जीवनात यशस्वी होऊ शकलो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला गुरूंनी दिलेली शिकवण कामी येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुस्थानी असलेल्या सर्वांना वंदन करतो, अशा भावना पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केल्या.

jalgaon sp dr. panjabrao ugle
डॉ. पंजाबराव उगले
author img

By

Published : Jul 5, 2020, 6:58 AM IST

Updated : Jul 5, 2020, 10:02 AM IST

जळगाव - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.

गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडिलांप्रमाणे शिक्षक माझ्या गुरुस्थानी ' - डॉ. पंजाबराव उगले

आई-वडिलांप्रमाणे शिक्षकांचा देखील आपल्या आयुष्यात गुरू म्हणून मोठा वाटा असतो. या गुरूंनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दाखवलेली वाट, शिकवण यामुळेच आपण आयुष्यात यशस्वी होत असतो. माझ्या आयुष्यात आई-वडिलांप्रमाणे माझे शिक्षक गुरुस्थानी आहेत. त्यांच्यामुळेच मी जीवनात यशस्वी होऊ शकलो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला गुरूंनी दिलेली शिकवण कामी येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुस्थानी असलेल्या सर्वांना वंदन करतो, अशा भावना पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केल्या.

डॉ. पंजाबराव उगले हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत. पोलीस दलात विविध विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी राज्यभर जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. सध्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.

ते म्हणाले, प्रत्येक व्यक्ती जसजसा मोठा होतो, तसतशी अनेक व्यक्तिमत्त्वे त्याच्या संपर्कात येतात. ही व्यक्तिमत्त्वे त्या व्यक्तीच्या मनावर गुरू म्हणून ठसा उमटवतात. आपले आई-वडील, शिक्षक त्याचप्रमाणे ज्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा, पाठबळ किंवा शिकवण मिळते, असे समाजातील काही मोठे लोक आपल्या गुरुस्थानी असतात. खरे तर गुरू हे आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनाला दिशा दाखवतात किंवा आपले जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याचा मार्ग दाखवतात.

माझ्या आयुष्यात गुरू म्हणून अनेक लोकांचे स्थान आहे. माझ्या आयुष्यात आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांचे देखील गुरू म्हणून मोलाचे योगदान आहे. हायस्कुलमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला आर.जे. कुलकर्णी म्हणून शिक्षक होते. कुलकर्णी सरांचा माझ्या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा राहिला आहे. सरांची शिकवण्याची पद्धत निराळीच होती. साध्या-सोप्या शब्दात विषय समजून सांगण्यात सरांचा हातखंडा होता.

सरांनी मला जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा दृष्टिकोन शिकवला. कुलकर्णी सरांचा प्रेमळ स्वभाव मला खूप भावत असे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला प्रेरणा मिळत गेली. सरांच्या पाठबळामुळे मी प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होत गेलो. आज मी जे काही आहे, ते सरांच्या शिकवणीमुळेच. जीवनाकडे सकारात्मकपणे पाहावे, ही सरांची शिकवण होती. याच शिकवणीमुळे मला संकटांशी दोन हात करण्याची हिंमत मिळते.

आज कुलकर्णी सर आपल्यात हयात नाहीत, याचे खूप दुःख आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या आयुष्यातील गुरुस्थानी असलेल्या सर्वांना मी नमन करतो, अशा भावना डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केल्या.

आर. जे. कुलकर्णी सरांनी कधी गुरुदक्षिणा घेतली नाही-हायस्कुलचे शिक्षण घेत असताना आर. जे. कुलकर्णी सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. मला विज्ञान विषयात कमी गोडी होती. माझा परफॉर्मन्सही थोडा कमी होता. मात्र, माझ्यातील गुण हेरून कुलकर्णी सर मला शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी बोलवायचे. माझ्यासाठी शिकवणी घ्यायचे. या शिकवणीसाठी सरांनी माझ्याकडून कधीही गुरुदक्षिणा घेतली नाही. सरांमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. त्यांनी मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम केले. कुलकर्णी सरांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. तो मी कधीही विसरू शकत नाही, अशी एक आठवण देखील डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या गुरूंविषयी बोलताना सांगितली.

Last Updated : Jul 5, 2020, 10:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.