ETV Bharat / state

बीएचआर घोटाळा : मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरच्या मुलास अटक

author img

By

Published : Jan 22, 2021, 9:58 PM IST

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुनील झंवर महिनाभरापासून पोलिसांना हुलकावणी देत आहे.

बीएचआर घोटाळा
बीएचआर घोटाळा

जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुनील झंवर महिनाभरापासून पोलिसांना हुलकावणी देत आहे. दुसरीकडे, पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी सुनील झंवरचा मुलगा सूरजला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता सुनील झंवरने नाशिकच्या मांडसांगवी येथील १०० कोटींची जमीन स्वस्तात घेतल्याच्या तक्रारीबात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अपर महसूल सचिवांनीही प्रकरणाची दखल घेतल्याने झंवरच्या अडचणी वाढल्या आहेत.

शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुणे येथे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात ठिकठिकाणी छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करुन कोट्यवधींचा अपहार केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करताना दोघा सीएंसह चौघांना अटक केली. तर गुन्हा दाखल झाल्यापासून अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.

जळगावातील घरातून घेतले ताब्यात-

झंवर महिनाभरापासून पोलिसांना सापडत नाहीये. मध्यंतरी तो जळगावात येऊन गेल्याची तसेच अटक न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली होती. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जळगावात तपासासाठी आले होते. अखेरीस या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवरला त्याच्या जळगावातील घरातून अटक केल्याची माहिती मिळत आहे.

महावीर जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला-

दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले सीए महावीर जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अन्य संशयित सीए धरम सांखला, विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांच्या जामीन अर्जावर २७ जानेवारीस सुनावणी होणार आहे.

हेही वाचा - सीरमला लागलेली आग घात की अपघात हे चौकशीनंतर कळेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष; तीन पक्षांना मिळून यश मिळवता आलं नाही - फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.