ETV Bharat / state

"लाॅकडाऊनने आमच्यावर मोठे संकट, आतातरी दुकाने उघडू द्या.." - जळगाव लाॅकडाऊन बातमी

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच जवळपास तीन ते साडेतीन महिने झाले आमची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य केले.

shopping-complex-shops-are-still-closed-at-jalgaon
"लाॅकडाऊनने आमच्यावर मोठे संकट, आतातरी दुकाने उघडू द्या.."
author img

By

Published : Jul 14, 2020, 6:43 PM IST

जळगाव- गेल्या तीन महिन्यांपासून आमची दुकाने बंद आहेत. त्यामुळे घरात खायला काहीही उरलेले नाही. कर्जाचे हप्ते थकले आहेत. अशा परिस्थितीत आमच्यावर भीक मागायची वेळ आली आहे. सम-विषम पद्धतीने का असेना, पण आम्हाला आतातरी दुकाने उघडून व्यवसाय करू द्या, अशी मागणी जळगाव शहरातील विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

"लाॅकडाऊनने आमच्यावर मोठे संकट, आतातरी दुकाने उघडू द्या.."

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 7 ते 13 जुलै दरम्यान, लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन मंगळवारपासून शिथिल करण्यात आला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्याबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी व्यापाऱ्यांना आशा होती. पण जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करताना शहरातील विविध मार्केट तसेच शॉपिंग कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास बंदी कायम ठेवल्याने व्यापाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. गेल्या 3 महिन्यांपासून ही दुकाने बंद असल्याने आता व्यापाऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. मंगळवारी बहुसंख्य व्यापारी महात्मा फुले मार्केट परिसरात एकत्र आले होते. त्यांनी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आम्ही आता आत्महत्या करायचेच बाकी...
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच जवळपास तीन ते साडेतीन महिने झाले आमची दुकाने बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य केले. खूप अडचणी सोसून आम्ही आमची दुकाने बंद ठेवली. चौथ्या लॉकडाऊननंतर पाचव्या टप्प्यात अनलॉक 1 च्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यात राज्यभरातील सर्वच व्यवहार सशर्त सुरू झाले. मात्र, जळगावातील मार्केट आणि शॉपिंग कॉप्लेक्समधील दुकानांबाबत स्थानिक प्रशासन सकारात्मक निर्णय घेत नाहीये. शहरातील स्टँड अलोन दुकांनाबाबत समविषम पद्धतीने परवानगी देण्यात आली. मग आमच्यावर अन्याय का? आता आम्ही आत्महत्या करायचेच बाकी राहिले आहे, अशा शब्दांत काही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

जगायचं तरी कसं?
तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने आमच्यावर अतिशय वाईट वेळ आली आहे. हे तीन महिने आम्ही कसे काढले? जे आम्हालाच माहिती आहे. घरात आता खायलाही उरलेले नाही. अशा परिस्थितीत घरखर्च, दुकानांचे भाडे व इतर खर्च, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हा मोठा प्रश्न आहे. आम्हालाही पोट आहे. कोरोनाचा संसर्ग असताना इतर ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे, तर आमच्यावरच अन्याय का? आम्ही देखील फिजिकल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझर अशा नियमावलीचे पालन करू. व्यवसाय करताना जे नियम मोडतील, त्यांच्यावर कारवाई करावी. पण शासनाने आता आम्हाला व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

15 ते 20 हजार दुकानांचा प्रश्न...

जळगाव शहरात महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, भास्कर मार्केट ही प्रमुख मार्केट आहेत. याठिकाणी कपडे, किराणा माल, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅरेज, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर असे साहित्य विक्रीची दुकाने आहेत. प्रत्येक मार्केटमध्ये किमान अडीच ते तीन हजार दुकाने आहेत. या सर्व दुकानांच्या माध्यमातून महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्याचा जळगाव शहराच्या अर्थकारणाशी थेट संबंध आहे. एका दुकानामागे किमान तीन ते चार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, तीन महिन्यांपासून ही दुकाने बंद असल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात शासनाने आतातरी सकारात्मक निर्णय घ्यावा, दुकाने उघडून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.