ETV Bharat / state

जळगाव लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही - गुलाबराव पाटील

जळगावमध्ये शिवसेनेची ताकद भाजपपेक्षा जास्त असल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केला.

गुलाबराव पाटील
author img

By

Published : Feb 18, 2019, 7:53 PM IST

जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली, तर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. याबद्दलचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील व्हीडिओ
undefined

गुलाबराव पाटील म्हणाले, की जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे ११ तर शिवसेनेचे १२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सभापती आहेत. या मतदारसंघाचा मागच्या काळातील राजकीय आलेख पाहिला तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपला चांगला लीड मिळाला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी, असा आमचा आग्रह आहे.

याची मागणी आम्ही शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी संजय सावंत पक्षप्रमुखांकडे मांडतील. त्यानंतर पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करू, असेही पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Intro:जळगाव
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली तरी जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे, असे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात सोमवारी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Body:गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे 11 तर शिवसेनेचे 12 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्याचप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सभापती आहेत. या मतदारसंघाचा मागच्या काळातील राजकीय आलेख पाहिला तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपला चांगला लीड मिळाला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी, असा आमचा आग्रह आहे. तशी मागणी आम्ही बैठकीत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी संजय सावंत हे पक्षप्रमुखांकडे मांडतील. त्यानंतर पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करू, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Conclusion:या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.