जळगाव मंत्री होणे आमच्या पंजोबाच्याही नशिबात नव्हते. मात्र, आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे, आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल, Minister Gulabrao Patil Challenge की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो त्यांनी आठ दिवस आमच्या बरोबर राहून पहा, नव्या दिवशी jalgaon public तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील Gulab Patil यांनी केले आहे.
स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात jalgaon public एका कार्यक्रमात केली आहे. Gulabrao Patil open challenge public दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे.
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवर गुलाबराव पाटील म्हणाले प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसाच प्रयत्न राज ठाकरे देखील करत आहेत. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा तोटा होईल, हे सांगता येत नाही. शेवटी कोणाचे डोके जास्त निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. घोडा मैदान दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत असून 4 ते 6 महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या Municipality and Zilla Parishad निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशी प्रतिक्रियाही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.