ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: मंत्र्यांच्या स्वागतासाठी भर रस्त्यावर विद्यार्थ्यांना उभे करण्यात आल्याचा प्रकार, मंत्री म्हणतात... याबद्दल काहीही कल्पना नाही

मंत्र्यांच्या स्वागतासाठी भर रस्त्यावर विद्यार्थ्यांना उभे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी अमळनेर येथील मराठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते, असे समोर आले आहे. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी, आपल्याला या प्रकाराची काहीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Minister Anil Patil
मंत्री अनिल पाटील
author img

By

Published : Jul 10, 2023, 10:16 AM IST

मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यात अनिल पाटील यांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज प्रथमच आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले आहेत. अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावर दुतर्फा उभे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आलेले विद्यार्थी, हे अमळनेर येथील मराठी आश्रम शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शिंदे- भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदा अनिल पाटील यांचे जळगावात आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत देखील करण्यात आले. मात्र मंत्री अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी उपयोग नाही : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदाच आपल्या अमळनेर मतदारसंघात आले असता त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आले होते. मात्र याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. अशा पद्धतीने मुलांना उभे करण चुकीचे आहे. मला माध्यमातून माहिती कळत असून याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. वाढदिवसानिमित्त किंवा इतर वेळेस त्यांच्यासोबत जेवण करत असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी उपयोग करण्याची मला आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : आम्हीच राष्ट्रवादी पक्ष, व्हिपही आम्हीच बजावणार - अनिल पाटील
  2. ​​NCP Political Crisis: शरद पवारांकडे केवळ 9 आमदार? ​​​44 आमदारांचे पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र असल्याचा आमदार अनिल पाटील यांचा दावा
  3. Maharashtra Political Crisis: आमदार सरोज अहिरे कोणाच्या सोबत? खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ मंत्री भुजबळांनी घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.