ETV Bharat / state

माझ्या मामाचं पत्र हरवलं! जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा - इंस्टाग्राम

पूर्वीच्या काळी पोस्ट कार्ड म्हणजे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी असलेले हक्काचे माध्यम होते. सुख-दुःखाचे निरोप पोहचवणे असो किंवा एकमेकांना काही संदेश देणे असो, पोस्ट कार्डशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. काळाच्या ओघात पोस्ट कार्ड हरवले आहे. जळगावात पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट कार्डचं उपलब्ध नाहीत.

जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:22 PM IST

जळगाव - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक पत्रलेखन मागे पडले आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतके जे काही लोकं अजूनही पोस्ट कार्डाचा वापर करतात; त्यांना सध्या पोस्ट कार्ड विकत मिळणेच मुश्किल झाले आहे. जळगावमधील मुख्य पोस्ट कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पोस्ट कार्ड मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा
तार, टेलिफोन, पेजर, फॅक्स, मोबाईल यांसारख्या तांत्रिक साधनांपाठोपाठ ईमेल, व्हाट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशी समाजमाध्यमे आली. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामुळे झालेल्या क्रांतिकारी बदलात पारंपरिक पोस्ट कार्ड मात्र बेपत्ता झाले आहे. पोस्टमनही फक्त शासकीय पत्रव्यवहारापर्यंतच मर्यादित राहिले आहेत. अशा परिस्थितीतही काही सर्वसामान्य नागरिक संपर्कासाठी आणि लेखकमंडळी पत्रलेखनाचा छंद जोपासण्यासाठी आजही पोस्ट कार्डचा वापर करतात. जळगावातल्या मुख्य पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील इतर पोस्ट कार्यालयांमध्ये पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. तीन ते चार महिन्यांपासून भारतीय पोस्ट विभागाच्या नाशिक येथील विभागीय भांडारातून पोस्ट कार्डचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. एरवी मागणीनुसार पोस्ट कार्डचा पुरवठा केला जात होता. मेलद्वारे मागणी केली की, दोन दिवसांत पोस्ट कार्ड दाखल व्हायची.जळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयाकडून तीन महिन्यांपूर्वी मागणी करुनही विभागीय भांडाराकडून पोस्ट कार्ड मिळालेली नाहीत. नागरिकांची मागणी घटल्याने पोस्ट विभागाने पोस्ट कार्डची छपाई केली नसल्याची माहिती आहे.

Intro:feed send to ftp
जळगाव
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक पत्रलेखन तर मागे पडलेच आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतके जे काही लोकं अजूनही पोस्ट कार्डाचा वापर करतात; त्यांना सध्या पोस्ट कार्ड विकत मिळणेच मुश्किल झाले आहे. जळगावातल्या मुख्य पोस्ट कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पोस्ट कार्ड मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.Body:तार, टेलिफोन, पेजर, फॅक्स, मोबाईल यासारख्या तांत्रिक साधनांपाठोपाठ ईमेल, व्हाट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमे आली. तंत्रज्ञान युगामुळे झालेल्या क्रांतिकारी बदलात पारंपरिक पोस्ट कार्ड मात्र बेपत्ता झाले. पूर्वीच्या काळी पोस्ट कार्ड म्हणजे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी असलेले हक्काचे माध्यम. सुख-दुःखाचे निरोप पोहचवणे असो किंवा एकमेकांना काही संदेश देणे असो, पोस्ट कार्डशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पोस्टमन दारात आला की कुणाचे तरी पत्र आले आहे, म्हणत उत्सुकता निर्माण व्हायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. काळाच्या ओघात पोस्ट कार्ड हरवले आहे. पोस्टमनही फक्त शासकीय पत्रव्यवहारापर्यंतच मर्यादित राहिले. अशा परिस्थितीतही काही सर्वसामान्य नागरिक संपर्कासाठी तर लेखकमंडळी पत्रलेखनाचा छंद जोपासण्यासाठी आजही पोस्ट कार्डचा वापर करतात. परंतु, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जळगावात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. पोस्ट कार्ड मिळत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.

जळगावातल्या मुख्य पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील इतर पोस्ट कार्यालयांमध्ये पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. तीन ते चार महिन्यांपासून भारतीय पोस्ट विभागाच्या नाशिक येथील विभागीय भांडारातून पोस्ट कार्डचा पुरवठा करण्यात आलेला नाही. एरवी मागणीनुसार पोस्ट कार्डचा पुरवठा केला जात होता. मेलद्वारे मागणी केली की दोन दिवसात पोस्ट कार्ड दाखल व्हायची. मात्र, आता जळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयाकडून तीन महिन्यांपूर्वी मागणी करुनही विभागीय भांडाराकडून पोस्ट कार्ड मिळालेली नाहीत. नागरिकांची मागणी घटल्याने पोस्ट विभागाने पोस्ट कार्डची छपाई केली नसल्याची माहिती आहे.Conclusion:रक्षाबंधनाच्या सणाला अनेक महिला आपल्या लाडक्या भावाला पारंपरिक पद्धतीने पत्र लिहितात. पत्रासोबत राखीही पाठवतात. याच हेतूने पोस्ट कार्ड घेण्यासाठी गेलेल्यांमुळे जळगावात पोस्ट कार्ड मिळत नसल्याचे समोर आले आहे. पोस्ट कार्ड उपलब्ध नसल्याने अनेक जण पर्यायी मार्ग निवडत आहेत. मात्र, पारंपरिक पत्रलेखन पद्धती कालबाह्य होऊ नये म्हणून पोस्ट विभागाने जुनी पोस्ट कार्ड उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा 'माझ्या मामाचं पत्र हरवलं' या बालगीताच्या ओळी खऱ्या ठरतील, यात शंका नाही.

बाईट: एल. एस. तायडे, नागरिक (खिशाला पेन लावलेले)
राजेश जाधव, नागरिक (चष्मा लावलेले)
पी. एन. महाजन, पोस्ट मास्टर, जळगाव (चष्मा लावलेले, खुर्चीवर बसलेले)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.