ETV Bharat / state

Russia Ukraine War : युक्रेनमधून जळगावातील पहिला विद्यार्थी परतला

युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान ( Russia Ukraine War ) जळगावातील विद्यार्थी परतला ( Student Jalgaon Returned From Ukraine ) आहे. सूरज रवींद्र शिंदे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सूरज आल्यानंतर आईवडीलांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

Jalgaon Returned From Ukraine
Jalgaon Returned From Ukraine
author img

By

Published : Mar 3, 2022, 3:56 PM IST

जळगाव - युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान ( Russia Ukraine War ) तो युक्रेनमध्ये अडकला. रोज होणारे बॉम्बस्फोट अन् गोळ्यांच्या फायरिंगच्या बातम्या पाहून आईवडिलांच्या काळजाचे ठोके वाढले. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीने युक्रेनमध्ये अडकलेला जळगावचा विद्यार्थी सुखरुप परतला ( Student Jalgaon Returned From Ukraine ) आहे.

रशिया युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यात युक्रेनमध्ये महाराष्ट्रातून शिक्षणासाठी गेलेले बरेचसे विद्यार्थी अडकले होते. जळगाव जिल्ह्यातील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना यूक्रेनमधून भारतात सुखरूप आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेला पाचोरा येथील सूरज रवींद्र शिंदे हा विद्यार्थी बुधवारी सुखरूप परतला आहे. त्याला सुखरुप पाहताच त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू कोसळले.

पाचोरा येथील रहिवासी रवींद्र शिंदे हे लष्करातील सेवानिवृत्त जवान आहेत. पत्नी मनिषा व मुलगा सुरज, एक मुलगी असा त्यांचा परिवार. सूरज हा दोन वर्षांपासून युक्रेनमधील मिलेशिया या शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अचानक रशियाने युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुरजच्या आईवडिलांच्या काळजाचे ठोके वाढले होते.

युक्रेनमधून जळगावातील पहिला विद्यार्थी परतला

अखेर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतातील विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राबविण्यात येणार्‍या केंद्र शासनाच्या मोहिमेला वेग आला. सूरज मुंबईवरून निघाल्याची बातमी कळताच त्याच्या आईवडिलांचा एकच निश्वास सोडला. रोज बॉम्बस्फोट अन् फायरिंग यामुळे दिवसेंदिवस युक्रेनमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. धोका आणि काळजी वाटली होती. केंद्र शासनाची मदत मिळाली. त्यांनी सुखरूप भारतात आणले. घरी सुखरूप पोहोचल्याचा मला शब्दांत सांगता येत नाही एवढा मोठा आनंद आहे. भारतीय दुतावास व केंद्र शासनाचा मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सुरजचे वडील रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Mahajev Jankar keeps mum : नवाब मलिक यांच्या राजीनाम्याकरिता भाजपची घोषणाबाजी; तर महादेव जानकरांचे मौन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.