ETV Bharat / state

यावलमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून सराफ दुकानावर दरोडा; 12 लाखांचा ऐवज लुटला

यावल शहरात भरदिवसा दरोड्याची घटना घडली आहे. सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले.

Robbery at jewelery shop
सराफ दुकानावर दरोडा
author img

By

Published : Jul 7, 2021, 9:13 PM IST

Updated : Jul 7, 2021, 10:12 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील यावल शहरात भरदिवसा दरोड्याची घटना घडली आहे. सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास, यावल शहरातील सराफ बाजारात असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे

हेही वाचा - Modi Cabinet Expansion : मोदी 2.0 मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, राणे-पाटील-कराड-पवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत सराफ बाजारात जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशिदास कवडीवाले नावाचे सराफ दुकान आहे. आज दुपारी दुकानात मोजके ग्राहक खरेदीसाठी आलेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा केला. काही मिनिटात त्यांचा चौथा साथीदार त्याठिकाणी आला. त्याने दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केल्यानंतर दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली. सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली. त्यानंतर दुकानात दागिन्यांच्या शोकेसची तोडफोड करून सुमारे सव्वा अकरा लाख रुपये किंमतीचे 24 तोळे सोन्याचे दागिने तसेच गल्लीतील 55 हजार रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले.

  • हवेत केली फायरिंग?

अचानक झालेल्या या घटनेमुळे दुकान मालक जगदीश कवडीवाले तसेच कर्मचारी घाबरून गेले. दरोडेखोरांनी यावेळी हवेत फायरिंग केल्याचीही चर्चा आहे. परंतु, त्याला दुजोरा मिळालेला नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी दरोडेखोरांच्या हातून बंदूक खाली पडल्याचेही सांगितले. पळून जात असताना एक दरोडेखोर खाली पडला. तो पायी पळाला तर अन्य तिघे दुचाकीवरून पळाले.

  • सुमारे 12 लाख रुपयांचा ऐवज चोरला-

या घटनेत दरोडेखोरांनी सुमारे 12 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी दुकानातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिसांनी दुकान मालक जगदीश कवडीवाले यांचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे.

  • दुचाकीने आले दरोडेखोर-

सोन्याचे दागिने लुटण्यासाठी आलेले दरोडेखोर हे दुचाकीने आलेले होते. दागिने लुटल्यानंतर तिघे दुचाकीने तर एक जण पायी पळून गेला. दरोडेखोरांनी दागिने लुटण्यापूर्वी दुकानाची रेकी केली असावी, याशिवाय दरोडेखोर हे सराईत असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी-

या घटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली. दरोडेखोरांच्या शोधार्थ यावल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

हेही वाचा - Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, भारती पवार मोदींच्या मंत्रिमंडळात, 43 मंत्र्यांनी घेतली शपथ

Last Updated : Jul 7, 2021, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.