ETV Bharat / state

कोरोनाच्या लढ्यात सेवानिवृत्त सैनिकांचे योगदान; कुठलेही मानधन न घेता करताहेत देशसेवा - News about Corona Virus

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेला सेवानिवृत्त सैनिक मदत करत आहेत. हे सेवानिवृत्त सैनिक दुचाकीत स्वतः चे पेट्रोल, घरून स्वतः चा जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन रस्त्यावर जनजागृती करत आहेत.

Retired soldiers are contributing to the Corona fight
कोरोनाच्या लढ्यात सेवानिवृत्त सैनिकांचे योगदान; कुठलेही मानधन न घेता करताहेत देशसेवा
author img

By

Published : Apr 29, 2020, 4:57 PM IST

जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. शासनाच्या आरोग्य विभागासह, महसूल व पोलीस प्रशासन या कामी दक्ष आहेत. कोरोनाच्या लढाईत पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाला मदत व्हावी म्हणून रक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार आर्मी, बीएसएफ यासह विविध सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले चोपडा तालुक्यातील 15 माजी सैनिक कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सेवा बजावत आहेत.

कोरोनाच्या लढ्यात सेवानिवृत्त सैनिकांचे योगदान; कुठलेही मानधन न घेता करताहेत देशसेवा

कोरोनाच्या लढाईत आपली सेवा देणारे हे माजी सैनिक कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता, स्वतः ची दुचाकी त्यात स्वतःचे पेट्रोल, घरून स्वतः चा जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन रस्त्यावर जनजागृती करत आहेत. चोपडा तालुक्यातील विविध गावांमधील हे 15 माजी सैनिक आपल्या सैन्य दलातील गणवेशात सकाळी 9 वाजता शहर पोलीस स्टेशनला एकत्र येतात. तेथून शहरातील विविध भागात आपली सेवा देत असतात. रस्त्यावर विनाकारण फिरणारे, मास्क न बांधणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांची ते समजूत काढत आहेत. या सैनिकांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या सैनिकांच्या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण देखील काहीअंशी हलका होत आहे.

हे आहेत सेवानिवृत्त जवान -

  • विजय प्रल्हाद पाटील (गरताड)
  • प्रभाकर फकिरा माळी (आडगाव)
  • भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर (वडगाव सिम)
  • रवींद्र जुलाल सोनवणे (आडगाव)
  • भिकन लोटन पाटील (कठोरा)
  • शिवदास आनंदा अहिरे (वराड)
  • मनोज शशिकांत चौधरी (आडगाव)
  • धनराज सुकदेव बाविस्कर (आडगाव)
  • संदीप विठ्ठल बडगुजर (अकुलखेडा)
  • विशाल प्रभाकर पाटील (आडगाव)
  • गजानन शालीग्राम पाटील (चोपडा)
  • भिकन लोटन पाटील ( कठोरा)
  • वासुदेव पंढरीनाथ कोळी (कोलंबा)
  • धनराज सुकदेव बाविस्कर (आडगाव)
  • बबन वसंत पाटील (मंगरुळ)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.