ETV Bharat / state

वडिलांच्या अंत्ययात्रेत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा गोळीबार; वृद्धाचा मृत्यू - फायरिंग

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांची चूक तुकाराम वना बडगुजर या ६० वर्षीय वृद्धाच्या जिवावर बेतली आहे.

घटनेची चौकशी करताना पोलीस
author img

By

Published : May 12, 2019, 2:47 PM IST

जळगाव - सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह त्याच्या मुलाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेकायदेशीरपणे बंदुकीतून फायरिंग केली. दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागल्याने अंत्ययात्रेसाठी आलेले तुकाराम बडगुजर (६०) यांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (८५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर श्रावण मोहकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा मुलगा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी आपल्या बंदुकीमधून हवेत एक फायर केले. त्यानंतर विठ्ठल मोहकर यांच्या मोठ्या मुलाने दुसरा फायर केला. दुसऱ्या फायरनंतर मोहकर यांचा लहान मुलगा दीपकने फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तिला तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेत आलेले बडगुजर यांना लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बडगुजर यांना मृतावस्थेत जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज दुपारी बडगुजर यांच्यावर पिंपळगाव हरेश्वरयेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित दीपकला ताब्यात घेतले आहे. ही घटना घडल्यानंतर बंदुकीतून नेमके फायर कोणी केले, याबाबत माहिती दिली जात नव्हती. विठ्ठल मोहकर हे कधी माझ्याकडून फायर झाले, असे म्हणत होते, तर कधी दीपकने फायर केले, असे सांगत होते. मुलाचा गुन्हा आपल्या अंगावर घेण्याचा ते प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दीपकच्या हातात बंदूक असताना फायर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मोहकर पिता-पुत्राच्या चुकीमुळे आपल्या वडिलांचा हकनाक बळी गेला. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी असा चुकीचा प्रकार केला. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मयत बडगुजर यांचा मुलगा गजानन बडगुजर यांनी केली आहे.

या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. परवाना असला तरी बंदुकीने अंत्ययात्रेत, अशा प्रकारे फायर करून श्रद्धांजली वाहता येते का? सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू झालेला असताना, त्याला शहीद झालेल्या सैनिकाला ज्याप्रमाणे बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली जाते, त्याप्रमाणे श्रद्धांजली वाहिल्याचा प्रकार घडल्याने मोहकर पिता-पुत्रावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Intro:Feed send to FTP
जळगाव
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पिता-पुत्राने केलेली चूक तुकाराम वना बडगुजर या ६० वर्षीय वृद्धाच्या जिवावर बेतली आहे. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह त्याच्या मुलाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेकायदेशीरपणे बंदुकीतून फायरिंग केली. दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेत आलेले तुकाराम बडगुजर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Body:जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय ८५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर श्रावण मोहकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पूत्र सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी आपल्या बंदुकीमधून हवेत एक फायर केले. त्यानंतर विठ्ठल मोहकर यांच्या मोठ्या मुलाने दुसरा फायर केला. दुसऱ्या फायरनंतर मोहकर यांचा लहान मुलगा दीपकने फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तिला तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेत आलेले पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तुकाराम बडगुजर यांना लागली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तुकाराम बडगुजर यांना मृतावस्थेत जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज दुपारी बडगुजर यांच्यावर पिंपळगाव हरेश्वरला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित दीपकला ताब्यात घेतले आहे. ही घटना घडल्यानंतर बंदुकीतून नेमके फायर कोणी केले, याबाबत माहिती दिली जात नव्हती. विठ्ठल मोहकर हे कधी माझ्याकडून फायर झाले, असे तर कधी दीपकने फायर केले, असे सांगत होते. मुलाचा गुन्हा आपल्या अंगावर घेण्याचा ते प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दीपकच्या हातात बंदूक असताना फायर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मोहकर पिता-पुत्राच्या चुकीमुळे आपल्या वडिलांचा हकनाक बळी गेला. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी असा चुकीचा प्रकार केला. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मयत बडगुजर यांचा मुलगा गजानन बडगुजर यांनी केली आहे.Conclusion:दरम्यान, या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. परवाना असला तरी बंदुकीने अंत्ययात्रेत अशा प्रकारे फायर करून श्रद्धांजली वाहता येते का? सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू झालेला असताना, त्याला शहीद झालेल्या सैनिकाला ज्याप्रमाणे बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली जाते, त्याप्रमाणे श्रद्धांजली वाहिल्याचा प्रकार घडल्याने मोहकर पिता-पुत्रावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.