ETV Bharat / state

Carving Sculptures On Soap निवृत्त व्यवस्थापकाने जोपासला साबणावर मुर्त्या कोरण्याचा अनोखा छंद - retired manager developed a unique hobby

जळगाव रेल्वेमधुन निवृत्त व्यवस्थापक अरुण पाटील यांनी आपला छंद (retired manager developed a unique hobby) जोपासण्यासाठी शेकडो मुर्त्यांचे साबणावर कोरीव काम (carving sculptures on soap) करून संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीची हुबेहुब मूर्ती पाहून अनेक जण त्यांच्याकडून मुर्त्या बनवून घेतात.

Carving Sculptures On Soap
साबणावर मुर्त्या कोरण्याचा अनोखा छंद
author img

By

Published : Sep 18, 2022, 5:55 PM IST

जळगाव : रेल्वेतुन निवृत्त व्यवस्थापक अरुण पाटील यांनी आपला छंद (retired manager developed a unique hobby) जोपासण्यासाठी शेकडो मुर्त्यांचे साबणावर कोरीव काम करून (carving sculptures on soap) संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीची हुबेहुब मूर्ती पाहून अनेक जण त्यांच्याकडून मुर्त्या बनवून घेतात आणि ते देखील वयाची 70 वर्षे पार करूनही; आपला छंद व आवडत आजही जोपासत आहे. तर आजही साबणावर वेगवेगळ्या मूर्तींचे कोरीव काम करून, आपला छंद जोपासण्याचे काम करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना कलाकार अरुण पाटील

महाविद्यालय शिक्षणापासून होता अनोखा छंद : जळगावतील रहिवासी असलेले अरुण पाटील यांना लहानपणापासूनच शाळा, महाविद्यालयात असताना वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम करून; विविध वस्तू बनवण्याची कला अवगत होती. त्यातून आपण वेगळे काय करू शकतो, हे त्यांच्या मनात नेहमीच खटकत असे. यातुनच त्यांनी इतरांपेक्षा वेगळी कलाकृतीला सुरुवात केली. सन 2012 मध्ये रेल्वे व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले अरुण पाटील यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर, परिवारासोबत वेळ देण्यास सुरुवात केली. सोबतच आपला छंद जोपासण्याकरिता साबना वर कोरीव काम करून; वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांची ही कला सर्वांनाच आवडत होती. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढत गेला आणि त्यातूनच शेकडो मुर्त्या आजपर्यंत त्यांनी संग्रहित केल्या.

अनेक देव देवतांच्या मुर्ती केल्या संग्रहित : आंघोळीच्या साबणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या साकारण्यासाठी सुई आणि ब्लेडच्या साह्याने मूर्ती काम करण्यात येते. सर्व मूर्ती तयार झाल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करण्यासाठी विविध रंगांची मदत घेतली जाते. मूर्ती आकर्षक करण्यासाठी इतर वस्तूंची ही मदत घेऊन अरुण पाटील आपला छंद जोपासत असतात. यात विशेषतः राधा राधाकृष्ण, हनुमान, सप्तशृंगी देवी, विष्णू, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर, नृसिंह स्वामी, साईबाबा, सरस्वती, महालक्ष्मी, शिवाजी महाराज, वाल्मीक रुषी आदींसह इतर देवदेवतांच्या मुर्त्या शेकडो संग्रहित करून अरुण पाटील यांनी जतन केले आहे.

70 वर्षीय बाबांनी जोपासला अनोखा छंद : सत्तर वर्षाच्या अरुण पाटील यांनी आपले कलागुण सादर करण्यासाठी चक्क आंघोळीच्या साबणाचा वापर केला आहे. शेकडो मुर्त्यांवर कोरीव काम करून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक मुर्त्या तयार करण्याचा आदर्श त्यांनी केला आहे. साबणावर कोरीव काम करून जळगावचे नाव एक वेगळ्याच रूपात निर्माण केले आहे. साबणावर कोरीव काम करून; आपल्या नावावर वेगवेगळ्या मुर्त्या संग्रहित करून, आपले नाव उज्वल करण्याचा अरुण पाटील यांचा मानस आहे.

आमचे शेजारी असलेले अरुण पाटील हे नेहमीच साबणावर कोरीव काम करून; वेगवेगळ्या मूर्ती सजावट करून संग्रहित करत असतात. याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही त्यांच्या शेजारी राहतो. आम्ही अनेक वेळा त्यांना साबणावर मुर्त्या बनवतांना पाहून आम्हालाही वेगळाच आनंद होत असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.