ETV Bharat / state

धक्कादायक; कोविड रुग्णालयात नातेवाईक करतात रुग्णांची सेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत झाले उघड - जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची रुग्णालयास भेट

कोविड रुग्णालयात चक्क नातेवाईकांकडूनच रुग्णांची सेवा करुन घेत असल्याचा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच पाहणीत समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

jalgaon
पाहणी करताना जिल्हाधिकारी
author img

By

Published : Jun 19, 2020, 9:14 PM IST

जळगाव - येथील कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा अजून एक धक्कादायक किस्सा शुक्रवारी दुपारी समोर आला. कोविड रुग्णालयात चक्क नातेवाईकांकडूनच रुग्णांची सेवा करुन घेत असल्याचा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच पाहणीत समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. त्यात हा प्रकार उघड झाला. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांना का सेवा करावी लागतेय ? नातेवाईक थेट रुग्णालयात कसे येतात ? असा जाब त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोविड रुग्णालयाची पाहणी केली. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने या पार्श्वभूमीवर त्यांनी अचानक ही सरप्राईज व्हिजिट दिली. त्यात कोविड रुग्णालयातील अनागोंदी समोर आल्याने जिल्हाधिकारी चांगलेच संतापले. रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईकच रुग्णांची सेवा करत असल्याने त्यांनी अधिष्ठातांसह डॉक्टर्सना जाब विचारला. यावेळी त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या वडिलांची सेवा करत असलेल्या तरूणाला विचारपूस करून कक्षाच्या बाहेर जाण्यास सांगितले.

पाहणी करताना जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी राऊत यांनी कोविड रुग्णालयात जवळपास सर्वच कक्षात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सुमारे सव्वातास त्यांनी सर्व कक्ष पिंजून काढत सविस्तर माहिती घेतली. यानंतर त्यांनी 15 मिनिटे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यालयात बैठकही घेतली. यावेळी प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. मारूती पोटे, डॉ. मधुकर गायकवाड, नोडल अधिकारी डी. आर. लोखंडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत यांनी सुरुवातीलाच कक्ष क्रमांक एकमध्ये भेट दिली. या ठिकाणी मस्टर तपासले, सीसीटीव्हीबाबत विचारणा केली. जिल्हाधिकारी पाहणी करत असताना एक रुग्ण उपचाराअभावी ताटकळले होते. त्यांची विचारपूस करून त्यांना तात्काळ दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रशासनाला दिल्या. यानंतर अतिदक्षता विभागात रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली. अधिष्ठातांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी राऊत यांनी आढावा घेतला. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांच्याकडून प्रयोगशाळेसंदर्भात त्यांनी माहिती घेतली. तपासण्या वाढविण्यासाठी काय करता येईल ? तपासण्यांची गती वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी विचारणा केली. किमान दोन दिवसात अहवाल आल्यास रुग्णांची गर्दी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.