जळगाव: एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजप ही सर्वात मोठी पार्टी असेल, असे हे सगळे चित्र दिसत होते. आणि ही देशाची निवडणूक ही याकरता चुरशीची होती की देशाच्या पंतप्रधान हे गुजरात मध्ये राहतात. आणि साहजिक आहे की त्यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असलेले केलेली कामे आणि टिकवून ठेवलेला राज्याशी नात आणी त्याच्याच बरोबर तिथलं असलेला संघटन यातूनच त्यांना जो बहुमताचा मत मिळतो आहे.
तर जनता त्यांच्या पाठीशी: महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांनी या गोष्टीचा बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे. यामुळे 27 वर्ष त्यामुळे राज्यात सलग 27 वर्ष सत्ता ठेवून सुद्धा बहुमताने या ठिकाणी जागा येत आहेत. याचाच अर्थ जनतेशी नातं आणि त्यांची कामे केली, तर जनता त्यांच्या पाठीशी राहते. हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
भारत जोडो यात्रा काढा व कुठलीही यात्रा: भारत जोडो यात्रा काढा. या कुठलीही यात्रा काढा जेथे मन जोडो होतो. जिथे, विकास जोडो होतं तिथे कुठलाही जोडो चालत नाही. मला तरी असं वाटतं की लोकांनी तिथे विकासाला मत दिला आहे. आणि विकासाच्या पुढे तुम्ही कुठलेही यात्रा काढा. ती यात्रा बघायला फक्त लोक येतात, पण शेवटी विकासाला मत देतात. हे या ठिकाणी सिद्ध झालं आहे, असा खोचक टीका गुजरात निकालावरती काँग्रेस पिछाडीवर असल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.