ETV Bharat / state

Bhagatisingh Koshyari Latest : माझ्या माहिती व अभ्यासाप्रमाणे रामदास हे छत्रपती शिवाजींचे गुरू- राज्यपाल - Bhagatisingh Koshyari Latest

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले ( MH gov on Shivjaji work ) , की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल. वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांनी ( MH gov on controversy statement ) स्पष्टीकरण दिले आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राज्यपालांनी बगल दिली आहे.

ज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याहस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन

author img

By

Published : Feb 28, 2022, 5:11 PM IST

Updated : Feb 28, 2022, 5:33 PM IST

जळगाव - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor Bhagasingh Koshyari ) यांनी सारवासारव केली आहे. माझा माहिती व अभ्यासाप्रमाणे रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, असा त्यांना दावा ( Guru of Shijai Maharaj ) केला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाच्या उद्घाटनानंतर ( Swimming pool at Uttar Maharashtra University ) राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले ( MH gov on Shivjaji work ) , की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल. वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांनी ( MH gov on controversy statement ) स्पष्टीकरण दिले आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राज्यपालांनी बगल दिली आहे.

हेही वाचा-पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करावी - विनोद पाटील

माफी मागण्याबाबत बोलणे राज्यपालांनी टाळले
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा-Ashok Chavan Statment On Governor : छत्रपती शिवरायांबद्दल नवे वाद नको -अशोक चव्हाण

काय म्हणाले होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते. चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करण्याची मागणी-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी तत्काळ माफी मागावी. तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केली आहे.

Last Updated : Feb 28, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.