ETV Bharat / state

पाऊस लांबल्यास जळगाव जिल्ह्यात पाणीबाणी उद्भणार; बहुसंख्य शहरांमध्ये पर्यायी व्यवस्था नाही - jalgaon water crisis

जळगाव - गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी भीषण पाणीटंचाई भासत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला तर अनेक शहरांमध्ये आताच पाणीबाणी निर्माण झाली आहे. तर बोटावर मोजता येतील इतक्या शहरांमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पाणीबाणी उद्भवल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव
author img

By

Published : May 27, 2019, 4:40 PM IST

जळगाव शहर

जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या सुमारे चार ते साडेचार लाख इतकी असून एवढ्या लोकसंख्येसाठी दररोज 80 एमएलडी पाणीसाठ्याची गरज भासते. आजमितीस वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर शहरात पाणीबाणी उद्भवू शकते. वाघूर धरणाच्या डाऊन स्कीम व्यतिरिक्त शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी पर्यायी व्यवस्था नाही. वाघूरमधील घटता जलसाठा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात अजून पाणीकपात होऊन पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसाआड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वाघूर धरण पुरेसे भरले नाही. त्यामुळे जळगावकरांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. वाघूर धरणाची जलपातळी 226.00 मीटर इतकी आहे. तर उच्चतम जलपातळी 234.10 मीटर आहे. महापालिकेची जलवाहिनी 220.20 मीटर जलपातळीवरून पाणी उचलते. सध्याचा जलसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी, उन्हाळ्याची तीव्रता पाहता जलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महापालिकेकडून डाऊनस्किम वापरात आणली जाणार आहे. डाऊनस्कीमची जलपातळी 215 मीटर इतकी आहे. दरम्यान, महापालिकेकडून आतापर्यंत एकाच वर्षी डाऊनस्किमचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर एकदाही डाऊनस्किमचा वापर झाला नसल्याने महापालिकेने उन्हाळ्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात डाऊनस्किमची तपासणी केली होती. धरणातील जलसाठा झपाट्याने घटत असल्याने आता जळगाव शहराची मदार डाऊनस्कीमवर असणार आहे.

जळगाव

भुसावळ

तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा आणि हतनूर धरणातून भुसावळ शहराला पाणीपुरवठा होतो. हतनूर धरणात दरवर्षी सुमारे 22 टीएमएलसी पाणीसाठा भुसावळसाठी आरक्षित असतो. मात्र, यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा कोरडाठाक पडला आहे. तर हतनूर धरणातील जिवंत साठा संपला असून मृतसाठा 25 टक्के शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हतनूरमध्ये 55 टक्के गाळ असल्याने बिकट स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहराला 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या सुमारे दीड ते पावणे दोन लाख इतकी होती. त्यात आतापर्यंत झालेली वाढ लक्षात घेतली तर शहराची लोकसंख्या आता अडीच ते पावणे तीन लाखांवर गेली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर भुसावळकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी कोणतीही व्यवस्था नाही. शहरात काही ठिकाणी नगरपालिकेने कूपनलिका खोदल्या आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन आता काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेने शहरातील चार सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केली. पण या उपाययोजना तोकड्या आहेत.

अमळनेर

अमळनेर शहराला अमळनेर तालुक्यातील जळोद येथील तापी नदीपात्रातील डोहमधून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तापी नदीपात्रातील डोहामध्ये असलेला जलसाठा अजून महिनाभर पुरू शकतो. मात्र, पाऊस लांबणीवर पडला तर अमळनेर शहरासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केली आहे. शहरात 25 ते 30 कूपनलिका तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या 8 ते 10 सार्वजनिक विहिरी आहेत. त्याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता अमळनेर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पाणीकपात केली होती.

यावल

शहराला हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हतनूर धरणातून कालव्याद्वारे पाणी यावल शहरातील साठवण तलावात आणण्यात येते. येथून पाईपलाईनद्वारे शहरात पाणीपुरवठा होतो. यावल शहरासाठी हतनूर धरणातून कालव्याद्वारे आवर्तन सोडले जाते. 15 एप्रिल रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. ते साधारणपणे सव्वा दोन महिने पुरेल, असा अंदाज आहे. शहराला दररोज सुमारे 50 ते 60 लाख लीटर पाणी लागते. पाऊस लांबणीवर पडला तर नगरपालिकेच्या 3 सार्वजनिक विहिरी आहेत, त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे.

चोपडा

शहराला सद्यस्थितीत 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गुळ नदीवर असलेल्या गुळ मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीपात्रातील नगरपालिकेच्या विहिरींवरून शहराला पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस गुळ प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने तो जूनच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल. त्यानंतर परिस्थिती अजून बिकट होईल. पाऊस लांबला तर नगरपालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.

चाळीसगाव

नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव शहराला नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणात आजमितीस 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून चाळीसगावला 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गिरणा धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता चाळीसगाव शहराला जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. पाऊस लांबला तरी शहराला पाणी समस्या भेडसावणार नाही.

भडगाव

गिरणा नदीपात्रात भडगाव नगरपालिकेने 3 सार्वजनिक विहिरी खोदल्या आहेत. या विहिरींद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या भडगाव शहराला दररोज 15 ते 16 लाख लीटर पाण्याची गरज भासते. पाऊस लांबला तरी नगरपालिकेच्या तिन्ही विहिरींचे पाणी शहराला पुरेसे आहे.

पाचोरा

पाचोरा शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहराला सद्यस्थितीत 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाऊस लांबणीवर पडला तर पाचोरा शहराची स्थिती अजून बिकट होऊ शकते. गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले तर शहराला काही अंशी दिलासा मिळू शकतो.

धरणगाव

ब्रिटिश काळापासून व्यापाराचे केंद्रबिंदू असलेले शहर म्हणून ओळख असणाऱ्या धरणगाव शहरात पाणीपुरठ्याचा प्रश्न बिकट आहे. सद्यस्थितीत शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. धरणगाव शहराला तापी नदीवरून तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. 40 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्याने शहराला सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. पाऊस लांबला तर येथील परिस्थिती अजून बिकट होईल.

जामनेर

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असून जामनेरला जून अखेरपर्यंत समस्या उद्भवणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, जळगाव महापालिका जळगाव शहरासाठी डाऊनस्कीमचा वापर करेल. तेव्हा जामनेरच्या समस्या वाढू शकतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

मुक्ताईनगर/बोदवड

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती बिकट आहे. मुक्ताईनगरपेक्षा बोदवड शहराची स्थिती अत्यंत वाईट आहे. मुक्ताईनगर शहराला आज 1 ते 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर बोदवड शहरात तब्बल 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मुक्ताईनगरला पूर्णा नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे काही जॅकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीने अजून खाली काही जॅकवेल केले आहेत. त्यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण झालेली नाही. पाऊस लांबला तर थोडी परिस्थिती गंभीर होईल. बोदवड शहराला पूर्णा नदीवरील ओडीएच्या 81 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेत बोदवड शहरासह तालुक्यातील 60 गावांचा समावेश आहे. पाऊस लांबला तर बोदवडमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.

पारोळा

शहरात सद्यस्थितीत 12 ते 14 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तामसवाडी धरणातून पारोळा शहराला पाणीपुरवठा होतो. आजमितीस तामसवाडी धरणात शून्य टक्के जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे आताच परिस्थिती बिकट असून पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, पारोळा शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल. तामसवाडी धरणात पाणी शिल्लक नसल्याने पारोळा तालुक्यातील बहुसंख्य गावे टँकरवर अवलंबून आहेत. शहरात काही ठिकाणी कूपनलिका आहेत. त्याद्वारे त्या त्या प्रभागातील पाणीपुरवठा होत आहे.

रावेर

शहराला सद्यस्थितीत एका दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रावेर शहराला तापी नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात असून अजून किमान 15 ते 20 दिवस समस्या निर्माण होणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपालिकेने आधीच नियोजन करून ठेवले आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या शहरात 4 कूपनलिका आहेत. त्यांना चांगले पाणी असल्याने शहराला पाणीटंचाई भेडसावणार नाही. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी 4 झोन आहेत. प्रत्येक दिवशी 2 झोनला पाणीपुरवठा केला जातो. रावेर शहराची लोकसंख्या विचारात घेतली असता शहराला दररोज सुमारे 44 लाख लीटर पाणी आवश्यक असते.

एरंडोल

एरंडोल शहराला सद्यस्थितीत 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी प्रकल्पासह काही कूपनलिका आणि सार्वजनिक विहिरींवर शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. आताच पाणीसंकट गंभीर आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, अजून बिकट परिस्थिती निर्माण होईल. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही.

Intro:Feed send to FTP
जळगाव
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी भीषण पाणीटंचाई भासत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला तर अनेक शहरांमध्ये आताच पाणीबाणी निर्माण झाली आहे. तर बोटावर मोजता येतील इतक्या शहरांमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पाणीबाणी उदभवल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.Body:1) जळगाव शहर
जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या सुमारे चार ते साडेचार लाख इतकी असून एवढ्या लोकसंख्येसाठी दररोज 80 एमएलडी पाणीसाठ्याची गरज भासते. आजमितीस वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर शहरात पाणीबाणी उदभवू शकते. वाघूर धरणाच्या डाऊन स्कीम व्यतिरिक्त शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी पर्यायी व्यवस्था नाही. वाघूरमधील घटता जलसाठा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात अजून पाणीकपात होऊन पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसाआड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वाघूर धरण पुरेसे भरले नाही. त्यामुळे जळगावकरांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. वाघूर धरणाची जलपातळी 226.00 मीटर इतकी आहे. तर उच्चतम जलपातळी 234.10 मीटर आहे. महापालिकेची जलवाहिनी 220.20 मीटर जलपातळीवरून पाणी उचलते. सध्याचा जलसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी उन्हाळ्याची तीव्रता पाहता जलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महापालिकेकडून डाऊनस्किम वापरात आणली जाणार आहे. डाऊनस्कीमची जलपातळी 215 मीटर इतकी आहे. दरम्यान, महापालिकेकडून आतापर्यंत एकाच वर्षी डाऊनस्किमचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर एकदाही डाऊनस्किमचा वापर झाला नसल्याने महापालिकेने उन्हाळ्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात डाऊनस्किमची तपासणी केली होती. धरणातील जलसाठा झपाट्याने घटत असल्याने आता जळगाव शहराची मदार डाऊनस्कीमवर असणार आहे.

2) भुसावळ
तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा आणि हतनूर धरणातून भुसावळ शहराला पाणीपुरवठा होतो. हतनूर धरणात दरवर्षी सुमारे 22 टीएमएलसी पाणीसाठा भुसावळसाठी आरक्षित असतो. मात्र, यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा कोरडाठाक पडला आहे. तर हतनूर धरणातील जिवंत साठा संपला असून मृतसाठा 25 टक्के शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हतनूरमध्ये 55 टक्के गाळ असल्याने बिकट स्थिती उदभवली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहराला 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या सुमारे दीड ते पावणे दोन लाख इतकी होती. त्यात आतापर्यंत झालेली वाढ लक्षात घेतली तर शहराची लोकसंख्या आता अडीच ते पावणे तीन लाखांवर गेली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर भुसावळकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी कोणतीही व्यवस्था नाही. शहरात काही ठिकाणी नगरपालिकेने कूपनलिका खोदल्या आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन आता काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेने शहरातील चार सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केली. पण या उपाययोजना तोकड्या आहेत.

3) अमळनेर
अमळनेर शहराला अमळनेर तालुक्यातील जळोद येथील तापी नदीपात्रातील डोहमधून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तापी नदीपात्रातील डोहमध्ये असलेला जलसाठा अजून महिनाभर पुरू शकतो. मात्र, पाऊस लांबणीवर पडला तर अमळनेर शहरासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केली आहे. शहरात 25 ते 30 कूपनलिका तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या 8 ते 10 सार्वजनिक विहिरी आहेत. त्याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता अमळनेर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पाणीकपात केली होती.

4) यावल
शहराला हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हतनूर धरणातून कालव्याद्वारे पाणी यावल शहरातील साठवण तलावात आणण्यात येते. येथून पाईपलाईनद्वारे शहरात पाणीपुरवठा होतो. यावल शहरासाठी हतनूर धरणातून कालव्याद्वारे आवर्तन सोडले जाते. 15 एप्रिल रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. ते साधारणपणे सव्वा दोन महिने पुरेल, असा अंदाज आहे. शहराला दररोज सुमारे 50 ते 60 लाख लीटर पाणी लागते. पाऊस लांबणीवर पडला तर नगरपालिकेच्या 3 सार्वजनिक विहिरी आहेत, त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे.

5) चोपडा
शहराला सद्यस्थितीत 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गुळ नदीवर असलेल्या गुळ मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीपात्रातील नगरपालिकेच्या विहिरींवरून शहराला पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस गुळ प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने तो जूनच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल. त्यानंतर परिस्थिती अजून बिकट होईल. पाऊस लांबला तर नगरपालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.

6) चाळीसगाव
नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव शहराला नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणात आजमितीस 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून चाळीसगावला 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गिरणा धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता चाळीसगाव शहराला जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. पाऊस लांबला तरी शहराला पाणी समस्या भेडसावणार नाही.

7) भडगाव
गिरणा नदीपात्रात भडगाव नगरपालिकेने 3 सार्वजनिक विहिरी खोदल्या आहेत. या विहिरींद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या भडगाव शहराला दररोज 15 ते 16 लाख लीटर पाण्याची गरज भासते. पाऊस लांबला तरी नगरपालिकेच्या तिन्ही विहिरींचे पाणी शहराला पुरेसे आहे.

8) पाचोरा
पाचोरा शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहराला सद्यस्थितीत 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाऊस लांबणीवर पडला तर पाचोरा शहराची स्थिती अजून बिकट होऊ शकते. गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले तर शहराला काही अंशी दिलासा मिळू शकतो.

9) धरणगाव
ब्रिटिश काळापासून व्यापाराचे केंद्रबिंदू असलेले शहर म्हणून ओळख असणाऱ्या धरणगाव शहरात पाणीपुरठ्याचा प्रश्न बिकट आहे. सद्यस्थितीत शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. धरणगाव शहराला तापी नदीवरून तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. 40 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्याने शहराला सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. पाऊस लांबला तर येथील परिस्थिती अजून बिकट होईल.

10) जामनेर
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आजमितीस वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असून जामनेरला जून अखेरपर्यंत समस्या उदभवणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, जळगाव महापालिका जळगाव शहरासाठी डाऊनस्कीमचा वापर करेल. तेव्हा जामनेरच्या समस्या वाढू शकतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

11) मुक्ताईनगर/बोदवड
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती बिकट आहे. मुक्ताईनगरपेक्षा बोदवड शहराची स्थिती अत्यंत वाईट आहे. मुक्ताईनगर शहराला आज 1 ते 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर बोदवड शहरात तब्बल 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मुक्ताईनगरला पूर्णा नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे काही जॅकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीने अजून खाली काही जॅकवेल केले आहेत. त्यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण झालेली नाही. पाऊस लांबला तर थोडी परिस्थिती गंभीर होईल. बोदवड शहराला पूर्णा नदीवरील ओडीएच्या 81 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेत बोदवड शहरासह तालुक्यातील 60 गावांचा समावेश आहे. पाऊस लांबला तर बोदवडमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.

12) पारोळा
शहरात सद्यस्थितीत 12 ते 14 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तामसवाडी धरणातून पारोळा शहराला पाणीपुरवठा होतो. आजमितीस तामसवाडी धरणात शून्य टक्के जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे आताच परिस्थिती बिकट असून पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, पारोळा शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल. तामसवाडी धरणात पाणी शिल्लक नसल्याने पारोळा तालुक्यातील बहुसंख्य गावे टँकरवर अवलंबून आहेत. शहरात काही ठिकाणी कूपनलिका आहेत. त्याद्वारे त्या त्या प्रभागातील पाणीपुरवठा होत आहे.Conclusion:13) रावेर
शहराला सद्यस्थितीत एका दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रावेर शहराला तापी नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात असून अजून किमान 15 ते 20 दिवस समस्या निर्माण होणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपालिकेने आधीच नियोजन करून ठेवले आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या शहरात 4 कूपनलिका आहेत. त्यांना चांगले पाणी असल्याने शहराला पाणीटंचाई भेडसावणार नाही. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी 4 झोन आहेत. प्रत्येक दिवशी 2 झोनला पाणीपुरवठा केला जातो. रावेर शहराची लोकसंख्या विचारात घेतली असता शहराला दररोज सुमारे 44 लाख लीटर पाणी आवश्यक असते.

14) एरंडोल
एरंडोल शहराला सद्यस्थितीत 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी प्रकल्पासह काही कूपनलिका आणि सार्वजनिक विहिरींवर शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. आताच पाणीसंकट गंभीर आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, अजून बिकट परिस्थिती निर्माण होईल. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.