ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी; आतापर्यंत १०१ टक्के पावसाची नोंद - water storage in jalgai

जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटला आहे.

धरण
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:12 AM IST

जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी ६६३.३ मिलीमीटर आहे. मात्र, यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिल्याने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल ६६८.६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील दृष्ये

मागील वर्षी सप्टेंबर, २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ६३.१ टक्के म्हणजेच ४१७.२ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी ६६८.६६ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक सरासरीपेक्षा जास्त १०१ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता, आजपर्यंत सर्वाधिक १२०.४ टक्के इतका पाऊस रावेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ७७.७ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात पडला आहे.

हेही वाचा - बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ, पक्ष पडझडीच्या काळात पवारच मैदानात

९ तालुके शंभरीपार -

जिल्ह्यात आज रविवारी ९ तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडला आहे. यात रावेर, एरंडोल, जामनेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव व चोपडा या तालुक्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात अजून १० ते १२ दिवस पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १२० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गिरणा धरण ९२ टक्के भरले -

जिल्ह्यातील ५ तालुक्यांसाठी वरदान असलेले गिरणा धरण ९२ टक्के भरले आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन गिरणा नदी काठावरील गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंजनी धरणातून विसर्ग सुरू -

एरंडोल तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अंजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अंजनी नदीला आलेला पूर व अंजनी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे हनुमंतखेडे, मजरे, सोनबर्डी, नांदखुर्द बुद्रुक, नांदखुर्द, एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

सिंचन प्रकल्प तुडूंब -

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. फक्त भोकरबारी, मन्याड आणि अग्नावती हे तीन प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प मिळून सुमारे ७० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा - दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का?, सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

Intro:जळगाव
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी ६६३.३ मिलीमीटर आहे. मात्र, यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिल्याने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल ६६८.६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.Body:मागील वर्षी सप्टेंबर, २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ६३.१ टक्के म्हणजेच ४१७.२ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी ६६८.६६ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक सरासरीपेक्षा जास्त १०१ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक १२०.४ टक्के इतका पाऊस रावेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ७७.७ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात पडला आहे.

९ तालुके शंभरीपार-

जिल्ह्यात आज अखेर ९ तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडला आहे. यात रावेर, एरंडोल, जामनेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, भडगाव व चोपडा या तालुक्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात अजून १० ते १२ दिवस पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १२० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गिरणा धरण ९२ टक्के भरले-

जिल्ह्यातील ५ तालुक्यांसाठी वरदान असलेले गिरणा धरण ९२ टक्के भरले आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन गिरणा नदी काठावरील गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंजनी धरणातून विसर्ग सुरू-

एरंडोल तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अंजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अंजनी नदीला आलेला पूर व अंजनी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे हनुमंतखेडे, मजरे, सोनबर्डी, नांदखुर्द बुद्रुक, नांदखुर्द, एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.Conclusion:सिंचन प्रकल्प तुडूंब-

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. फक्त भोकरबारी, मन्याड आणि अग्नावती हे तीन प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प मिळून सुमारे ७० टक्के जलसाठा झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.