जळगाव - शहरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 50 जणांना अटक झाली असून, पोलिसांनी एकूण 21 लाख 52 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत पोलिसांनी 2 महागड्या कार तसेच 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अटक झालेल्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या खोलीत पहिला छापा टाकला. त्यानंतर दुसरी कारवाई ही मध्यरात्रीनंतर 2 वाजता जुने बसस्थानक परिसरातील मनीष कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत झाली. कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईत, जुगार खेळणाऱ्या 13 जणांना अटक झाली. त्याठिकाणाहून पोलिसांनी 5 दुचाकींसह 1 लाख 81 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मनीष कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दुसरी कारवाई झाली. या कारवाईत 37 जणांना अटक झाली. याठिकाणी पोलिसांनी 9 दुचाकी, 2 महागड्या कारसह 19 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवाईप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरुद्ध दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत 13 जणांना अटक
जेएमपी मार्केटमध्ये झालेल्या पहिल्या कारवाईत पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मु.जु. अधिनियम 4/5 भादंवि कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएमपी मार्केटमध्ये बापू रघुनाथ सूर्यवंशी (वय 38, रा. गेंदालाल मिल, जळगाव) यांच्या दलित क्रीडा संस्था नावाच्या कार्यालयात जुगार अड्डा सुरू होता. येथे जुगार खेळताना बापू सूर्यवंशी याच्यासह जुबेर फारुख खान (वय 31, रा. मास्टर कॉलनी, जळगाव), नजीर शफी पिंजारी (वय 50, रा. जुने जळगाव), अब्दुल आहेद अब्दुल रहेमान (वय 44, रा. शनिपेठ), शेख फय्याजोद्दीन कमरोद्दीन (वय 43, रा. शनिपेठ), आबेद खान शब्बीर खान (वय 37, रा. तांबापुरा, जळगाव), अरमान रज्जाक पटेल (वय 28, रा. गेंदालाल मिल), मयूर संजय जगताप (वय 27, रा. द्वारकानगर), परशुराम बन्सी चावरे (वय 49, रा. वाल्मीकनगर), सलीम शहा अब्बास शहा (वय 55, रथचौकाजवळ, जळगाव), तुषार नरेंद्र वरयानी (वय 39, रा. सिंधी कॉलनी, जळगाव), सुखदेव ज्योतिराम गवळी (वय 51, रा. रामेश्वर कॉलनी), पंकज शरद पवार (वय 28, रा. द्वारकानगर) यांना अटक झाली आहे.
दुसऱ्या कारवाईत 37 जणांना अटक
दुसरी कारवाई मनीष कॉम्प्लेक्समध्ये झाली. याठिकाणी धरणगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भादू महाजन (वय 53, रा. मोठा माळीवाडा, धरणगाव) यांचा योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (धरणगाव) नावाने जुगार अड्डा सुरू होता. या अड्ड्यावर राजकीय क्षेत्रातील बड्या हस्ती जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ यांनी फिर्याद दिली असून, 37 जणांविरुद्ध मुंबई जुगार कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही कारवाईत कोरोना विषाणूच्या अनुषंगाने साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले म्हणूनही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ज्ञानेश्वर भादू महाजन (वय 53, रा. मोठा माळीवाडा, धरणगाव), जितेंद्र प्रल्हाद माळी (वय 38, रा. संजयनगर, जळगाव), चारुदत्त रवींद्र पाटील (वय 28, रा. बळीराम पेठ), हरिश्चंद्र प्रल्हाद बडगुजर (वय 40, रा.शनिपेठ), हेमेंद्र संजय महाजन (वय 32, रा. नवीपेठ), प्रवीण रमेश पाटील (वय 40, रा. आर. एल. कॉलनी), ललित गणेश चौधरी (वय 26, रा. ईश्वर कॉलनी), सलीम खान मुसा खान (वय 55, रा. शिवाजीनगर), अनिल माधवराव दायमा (वय 56, रा.पोलन पेठ), रोहित राजेंद्र शिंदे (वय 20, रा. ईश्वर कॉलनी), हितेंद्र मोतीलाल शर्मा (वय 36, रा. मानराज पार्क पिंप्राळा), अशोक सुभाष शर्मा (वय 35, रा. कांचन नगर), प्रवीण तुकाराम हिंगोले (वय 27, रा. मायदेवीनगर), जितेंद्र अनिल सोनार (वय 34, रा.विठ्ठल पेठ), सय्यद रिजवान सय्यद जफर (वय 46, रा. खडका रोड, भुसावळ), भूषण साहेबराव पाटील (वय 35, रा. पारख नगर, जळगाव), शेख शकील शेख रशीद (वय 55, रा. मेहरूण), अरुण वामन पाटील (वय 55, रा. गार्डी, ता. जळगाव), मोतीलाल ताराचंद पुषनानी (वय 65, रा. सिंधी कॉलनी), रहेमतुल्ला खान गुलशेर खान (वय 52, नागझिरी मोहल्ला, रावेर), संदीप सुधाकर चौधरी (वय 35, रा. शिव कॉलनी), सतीश रामकृष्ण चौधरी (वय 54, रा. खोटे नगर), सुरेश सीताराम कोळी (वय 42, रा. गुरुदेव नगर, जळगाव), समाधान प्रभाकर सपकाळे (वय 38, रा. अयोध्यानगर, जळगाव), सय्यद इर्शाद अली बालम अली (वय 42, रा.गेंदालाल मिल), मुनाफ रहीम मनियार (वय 56, रा. बिबी तलाव, धरणगाव), शेख इब्राहिम शेख चांद (वय 59, रा. काट्याफाईल, जळगाव), गणेश आत्माराम महाजन (वय 36, रा. गुरव गल्ली, धरणगाव) रवींद्र प्रतापसिंग क्षत्रिय (वय 39, रा. मोठा माळीवाडा, धरणगाव), मनोज जयंतीलाल राज (वय 58, रा. बोरीवली, मुंबई), सचिन दामू गवळी (वय 39, रा. शनिपेठ, जळगाव), गोपाळ वासुदेव बडगुजर (वय 30, रा. लोहार गल्ली, धरणगाव), गुड्डू लांगड सहानी (वय 36, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), गोविंदा विठ्ठल डापसे (वय 44, रा. बळीराम पेठ, जळगाव) शेख अब्दुल्ला शेख रहेमान (वय 56, रा. मराठे गल्ली धरणगाव), मयूर नरेंद्र चंदनकर (वय 44, रा. बळीराम पेठ, जळगाव), सागर भीमराव सोनवणे (वय 26, रा. वाल्मिक नगर, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या 'त्या' शब्दाला केराची टोपली दाखवली - प्रवीण दरेकर
हेही वाचा - मुंबईत केंद्रसरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन