ETV Bharat / state

बीएचआर प्रकरणी जळगावात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई, १२ जणांना अटक - जळगावात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, १२ जणांना अटक

raid by pune economic crime branch in jalgaon 7 people detained for interrogation
बीएचआर प्रकरणी जळगावात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, १२ जणांना अटक
author img

By

Published : Jun 17, 2021, 8:46 AM IST

Updated : Jun 17, 2021, 3:36 PM IST

08:39 June 17

बीएचआर प्रकरणी जळगावात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई, १२ जणांना अटक

जळगाव - राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (गुरुवारी) राज्यभरात ठिकठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत सकाळपासून आतापर्यंत 12 संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे याठिकाणी हे छापे पडले आहेत. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या 15 टीमकडून एकाच वेळी ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ही माहिती दिली आहे.

अटक केलेल्या संशयितांची नावे अशी-

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.

अटक सत्राचा दुसरा अंक-

बीएचआर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक सत्राचा दुसरा दणका दिला असून, आज पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली. यापूर्वीही नोव्हेंबर 2020मध्ये या प्रकरणात कारवाई झाली होती. तेव्हा 6 जणांना अटक झाली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता पुन्हा काही संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर हे अटक सत्र राबविण्यात आले आहे.

राजकीय नेत्यांच्या समर्थकांचा संशयितांमध्ये समावेश -

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या दोन कट्टर समर्थकांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्यांमध्ये जामनेर येथील जितेंद्र पाटील, छगन झाल्टे आणि राजेश लोढा यांचा समावेश आहे. यातील जितेंद्र पाटील व छगन झाल्टे हे आमदार गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांचे नातेवाईक असलेले सुवर्ण व्यावसायिक भागवत भंगाळे यांनाही अटक झाली आहे. भंगाळे हे भोळे यांचे मेहुणे आहेत. ते जळगावातील प्रतिथयश व्यावसायिक मानले जातात. यामुळे त्यांना झालेली अटक ही खळबळजनक ठरली आहे. तर भुसावळातून अटक करण्यात आलेले आसिफ तेली हे देखील भाजप नेत्याचे पूत्र आहेत. या प्रकरणातील राजकीय आयाम हा धक्कादायक ठरल्याचे मानले जात आहे.

काय आहे बीएचआर प्रकरण?

जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था ही एकेकाळी राज्यात नावाजलेली पतसंस्था होती. या पतसंस्थेच्या देशभरात सुमारे 84 शाखा आहेत. यातील जळगावातील मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये बेहिशेबी कर्जवाटप, आर्थिक अनियमितता तसेच ठेवीदारांची फसवणूक अशी प्रकरणे समोर आली होती. हे सुरू असल्याने पतसंस्था अवसायनात गेली होती. त्यामुळे 2015 मध्ये पतसंस्थेवर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाली होती. कंडारे याने काही संचालक, बडे कर्जदार आणि इतर राजकीय मंडळीला हाताशी धरून, ठेवीदारांच्या ठेव पावत्यांच्या आधारे संस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावात विक्री केल्या. यात सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020मध्ये फिर्यादी रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासाची सूत्रे हलली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. त्यात 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापे घातले. यात पहिल्याच दिवशी 5 संशयितांना अटक केली होती. 3 दिवसांच्या तपासानंतर बीएचआरच्या जळगावातील एमआयडीसी परिसरात असलेल्या मुख्य शाखेतून 2 ट्रक भरून कागदपत्रे, संगणक, हार्ड डिस्क असे ठोस पुरावे घेऊन पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. यानंतर 22 जानेवारी 2021 रोजी मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर याला जळगावातून अटक झाली होती. अटक झालेल्या 6 जणांच्या विरोधात पुणे न्यायालयात 23 फेब्रुवारी 2021 रोजी पहिले दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यानंतर सुरुवातीच्या अटकेतील 6 पैकी 5 जणांना जामीन मिळाला आहे. तर संशयित आरोपी असलेला विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, अवसायक जितेंद्र कंडारे आणि मुख्य संशयित सुनील झंवर हे अद्याप बेपत्ता आहेत.

संशयितांच्या घरांमध्येही झाडाझडती-

दरम्यान, पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे कार्यालय तसेच घरांमध्येही झाडाझडती घेतली. काही कागदपत्रे आणि इतर पुरावे ताब्यात घेतले. संशयितांना अटक केल्यानंतर पुण्याला नेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Last Updated : Jun 17, 2021, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.