ETV Bharat / state

जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात २८ विद्यार्थ्यांचे रॅगिंग - ragging in jalgaon

पीडित विद्यार्थी हा परभणी येथील राहणारा आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर)ला त्याच्या पालकांनी त्याला महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील तासिका आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनियर्स विद्यार्थ्यांनी पहाटे 2 वाजताच्या सुमारास नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

जळगावात विद्यार्थ्यांचे रॅगिंग (संग्रहित)
author img

By

Published : Oct 13, 2019, 7:55 PM IST

जळगाव - कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री वसतिगृहात २८ विद्यार्थ्यांना डांबून, विवस्त्र करत त्यांची रॅगिंग घेतल्याचा खळबळजनक प्रकार जळगावातील इकरा युनानी महाविद्यालयात रविवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडला. हा प्रकार उघडकीस येताच महाविद्यालय प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित केले. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासह केंद्र सरकारच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे मेलद्वारे तक्रार केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर; मोदींच्या आईची घेतली भेट

पीडित विद्यार्थी हा परभणी येथील राहणारा आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) रोजी त्याच्या पालकांनी त्याला महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील तासिका आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनिअर्स विद्यार्थ्यांनी पहाटे 2 वाजताच्या सुमारास नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला. यानंतर काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन नंतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केला. सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अॅक्टींग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळखपरेड सुरू केली होती.

हेही वाचा - मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केडला भीषण आग, 1 जणाचा मृत्यू

यावेळी पीडित विद्यार्थ्याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच 3-4 जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली. यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. खिशातील १८ हजार रुपये देखील काढून घेतले. त्याला तोंडाने फुंकर मारुन ट्युबलाईट विझवण्याची टास्क देण्यात आली. विद्यार्थ्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर त्याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला. यानंतर त्याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन संबंधित माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करीत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित केले. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याचा याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबवला आहे. त्याबद्दलची तक्रार त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकारामुळे जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Intro:जळगाव
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री वसतिगृहात २८ विद्यार्थ्यांना डांबून, विवस्त्र करीत त्यांची रॅगिंग घेतल्याचा खळबळजनक प्रकार जळगावातील इकरा युनानी महाविद्यालयात रविवारी पहाटे दोन वाजता घडला. हा प्रकार उघडकीस येताच महाविद्यालय प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित केले. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासह केंद्र शासनाच्या दिल्ली येथील अॅन्टी रॅगिंग सेलकडे मेलद्वारे तक्रार केली आहे.Body:मुदस्सर मुख्तार इनामदार (वय १९, रा. परभणी) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. मुदस्सर हा परभणी येथील राहणारा असून शुक्रवारी (११ ऑक्टोबर) रोजी त्याच्या पालकांनी त्याला महाविद्यालयात सोडले होते. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. दिवसभर महाविद्यालयातील तासिका आटोपल्यानंतर रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनियर्स विद्यार्थ्यांनी पहाटे दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला. यानंतर काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन नंतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केला. सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अॅक्टींग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळखपरेड सुरू केली होती. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ देखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली. यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. खिशातील १८ हजार रुपये देखील काढून घेतले. त्याला तोंडाने फुंकर मारुन ट्युबलाईट विझवण्याची टास्क देण्यात आली. विद्यार्थ्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला. यानंतर त्याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन संबंधित माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करीत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित केले.Conclusion:दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबवला असून त्याची तक्रार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकारामुळे जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फोटो : मुदस्सर मुख्तार इनामदार, पीडित विद्यार्थी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.