ETV Bharat / state

रावेर लोकसभेत भाजप-काँग्रेसमध्ये चुरस; एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष - bjp

या वेळच्या निवडणुकीत लेवा समाजाचेच दोन्ही तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे
author img

By

Published : Apr 13, 2019, 7:00 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. आजपर्यंत या मतदारसंघातून लेवा समाजाचा उमेदवार संसदेत प्रतिनिधित्व करत आला आहे. या वेळच्या निवडणुकीत लेवा समाजाचेच दोन्ही तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना सासरे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचे वलय आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे याठिकाणी अद्यापही मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे रक्षा खडसेंना मैदान मारणे सोपे नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे भाजपसोबत मनोमिलन कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावर भाजप-सेनेचे वर्चस्व असले तरी गेल्या ५ वर्षात खडसेंना केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग, भुसावळ एमआयडीसीचा विकास, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, असे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आलेले नाही.

रावेर लोकसभेत भाजप-काँग्रेसमध्ये चुरस

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरू होते. आता ते मतदारसंघात परतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. ५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपल्याला पुन्हा संधी मिळेल, असा विश्वास रक्षा खडसेंना आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून याठिकाणी रिंगणात असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना वैद्यकीय सेवेचे कोंदण आहे. मात्र, त्यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खिळखिळे पक्ष संघटन, पक्षांतर्गत गटबाजी या बाबींचे विरोधकांपेक्षा अधिक आव्हान असणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसची विचारसरणी मानणारा वर्ग मोठा आहे. परंतु, कार्यकर्त्यांची वानवा असल्याने या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी डॉ. पाटलांना कसरत करावी लागणार आहे. लेवा आणि मराठा समाजाचा कौलदेखील निर्णायक ठरत असल्याने राष्ट्रवादीचे पाठबळ डॉ. पाटलांसाठी बुस्टर ठरेल. आपली लढाई थेट मोदींशी आहे, असे मानणाऱ्या पाटलांना कितपत यश येते, याची उत्सुकता आहे.

तर, रावेरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्याकडेही लक्ष असेल. या मतदारसंघात आदिवासी मुस्लीम तसेच दलित समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. कारण रक्षा खडसे आणि उल्हास पाटील हे दोन्ही लेवा समाजाचे उमेदवार असल्याने लेवा समाजातील मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या ताकदीमुळे प्रथमदर्शनी रावेरात भाजपचे पारडे जड आहे. त्यामुळे डॉ. पाटलांना चांगला जोर लावावा लागेल, हे निश्चित.

Intro:Feed send to FTP
जळगाव
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. आजपर्यंत या मतदारसंघातून लेवा समाजाचा उमेदवार संसदेत प्रतिनिधित्व करत आलाय. या वेळच्या निवडणुकीत लेवा समाजाचेच दोन्ही तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमकी कोणाला संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.Body:भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना सासरे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचे वलय आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे याठिकाणी अद्यापही मनोमिलन झालेले नाही. त्यामुळं रक्षा खडसेंना मैदान मारणं सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. शिवसेनेचं भाजपसोबत मनोमिलन कधी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या मतदारसंघावर भाजप-सेनेचे वर्चस्व असले तरी गेल्या 5 वर्षात खडसेंना केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग, भुसावळ एमआयडीसीचा विकास, शेतीसाठी सिंचन व्यवस्था असे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आलेलं नाही. माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरू होते. आता ते मतदारसंघात परतल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. 5 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपल्याला पुन्हा संधी मिळेल, असा विश्वास रक्षा खडसेंना आहे.

बाईट: रक्षा खडसे, भाजप उमेदवार

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून याठिकाणी रिंगणात असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना वैद्यकीय सेवेचे कोंदण आहे खरं. मात्र, त्यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खिळखिळ पक्ष संघटन, पक्षांतर्गत गटबाजी या बाबींचे विरोधकांपेक्षा अधिक आव्हान असणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसची विचारसरणी मानणारा वर्ग मोठा आहे. परंतु, कार्यकर्त्यांची वानवा असल्यानं या वर्गापर्यंत पोहचण्यासाठी डॉ. पाटलांना कसरत करावी लागणार आहे. लेवा आणि मराठा समाजाचा कौल देखील निर्णायक ठरत असल्यानं राष्ट्रवादीचे पाठबळ डॉ. पाटलांसाठी बुस्टर ठरेल. आपली लढाई थेट मोदींशी आहे, असं मानणाऱ्या पाटलांना कितपत यश येतंय, याची उत्सुकता आहे.

बाईट: डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे उमेदवारConclusion:रावेरात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्याकडेही लक्ष असेल. या मतदारसंघात आदिवासी मुस्लीम तसंच दलित समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. कारण रक्षा खडसे आणि उल्हास पाटील हे दोन्ही लेवा समाजाचे उमेदवार असल्यानं लेवा समाजातील मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. माजीमंत्री खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या ताकदीमुळं प्रथमदर्शनी रावेरात भाजपचं पारडं जड आहे. त्यामुळं डॉ. पाटलांना चांगला जोर लावावा लागेल, हे निश्चित.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.