ETV Bharat / state

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर कुंभार व्यावसायिकांवर 'संक्रांत'; संचारबंदीमुळे आली उपासमारीची वेळ - कुंभार व्यावसायिक

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपले वाडवडील व पितृ यांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. कुंभार व्यावसायिकांसाठी हा सण म्हणजे कमाई करण्याचा महत्त्वाचा काळ मानला जातो. पण यावर्षी कमाई तर सोडाच व्यवसायात टाकलेला खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे ? असा उद्विग्न सवाल जळगावातील ज्येष्ठ कुंभार व्यावसायिकांनी उपस्थित केला.

Jlg
माठ पाहताना महिला
author img

By

Published : Apr 26, 2020, 10:39 AM IST

जळगाव - कोरोनामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील कुंभार व्यावसायिकांवर उपासमारीची दुर्दैवी वेळ आली आहे. संचारबंदीमुळे अक्षय्य तृतीयेसाठी तयार करुन ठेवलेली मडकी, थंड पाण्याचे माठांची विक्री झाली नाही. दुसरीकडे ग्राहक देखील मडकी आणि माठ खरेदीसाठी येत नसल्याने कुंभार व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर कुंभार व्यावसायिकांवर 'संक्रांत'; संचारबंदीमुळे आली उपासमारीची वेळ

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया हा सण आज आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपले वाडवडील व पितृ यांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. कुंभार व्यावसायिकांसाठी हा सण म्हणजे कमाई करण्याचा महत्त्वाचा काळ मानला जातो. यंदा मात्र, सगळीकडे कोरोनासोबतची लढाई सुरू आहे. अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नाही. या सगळ्या गोष्टींचा फटका कुंभार व्यावसायिकांना बसला आहे. अक्षय्य तृतीयेच्या तीन महिने अगोदरपासून कुंभार व्यावसायिक मडकी, माठ घडविण्यास सुरुवात करतात. हा माल बनवून तयार ठेवला जातो. परंतु, यंदा माल असूनही मागणी नसल्याने हातावर पोट असलेल्या कुंभार व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे.

अक्षय्य तृतीयेला गावोगावी खेड्यावर जाऊन विकलेल्या मालावरच पुढील सण, उत्सव यांचे गणित ठरलेले असते. मात्र, यंदाचा सिझन कोरोनामुळे सपशेल फेल गेला आहे. लग्नसराईत लागणारे माठ, उन्हाळ्यात थंड पाणी तयार होण्यासाठी तयार केलेले मडक्याची सुद्धा मागणी कमी झाली. अशा परिस्थितीत कुंभार व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमच्या उभ्या आयुष्यात अशी अक्षय्य तृतीया आम्ही पाहिली नाही. अक्षय्य तृतीयेच्या काळात माठ, मडक्याच्या विक्रीतून होणाऱ्या आर्थिक कमाईवर वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण यावर्षी कमाई तर सोडाच व्यवसायात टाकलेला खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे ? असा उद्विग्न सवाल जळगावातील ज्येष्ठ कुंभार व्यावसायिकांनी उपस्थित केला.

कोरोनामुळे यावर्षी घागर घडविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना कुंभार व्यावसायिकांना करावा लागला. घागर, माठ तसेच मडकी घडविण्यासाठी मातीही मिळाली नाही. मागच्या वर्षाच्या मातीत आम्ही घागरी, माठ घडवल्या. कोरोनामुळे घागरी भाजण्यासाठी सरपणही उपलब्ध झाले नाही. आहे त्या परिस्थितीत घागरी घडवल्या आणि बाजारात विक्रीसाठी आणल्या. मात्र, बाजारात घागर घेण्यासाठी ग्राहकच नसल्याने विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.