ETV Bharat / state

नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रोहोम एकनाथ खडसेंच्या दारी - Bapu Rohom

जिल्ह्यात १६ आक्टोंबरला ट्रकमधून गुटखा धुळ्याहुन मेहुणबारेकडे आणला जात होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा व मेहरुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यात हा ट्रक अडवला. पोलीस कर्मचारी हा ट्रक सोडून देण्याच्या तयारीत होते असा आरोप करीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक जळगाव शहराजवळ अडवला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रोहोम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यानंतर रोहोम यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे.

Bapu rohom
बापू रोहोम
author img

By

Published : Oct 31, 2020, 4:08 PM IST

जळगाव - चाळीसगाव तालुक्यात अवैध गुटखा वाहतूक ट्रक पकडल्यानंतर तिथेच जप्त न करता जळगावात आणल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. बदलीचे आदेश आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक रोहोम यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मनपा आयुक्तांपाठोपाठ पोलीस अधिकारीही खडसेंच्या भेटीसाठी वाऱ्या करायला लागल्याने खडसे यांचे प्रशासनातील वर्चस्व वाढल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

रोहोम प्रकरण आहे तरी काय..

जिल्ह्यात १६ आक्टोंबरला ट्रकमधून ६६ लाख ८६ हजार ९९९ रुपयांचा गुटखा धुळ्याहुन मेहुणबारेकडे आणला जात होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा व मेहरुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यात हा ट्रक अडवला. पोलीस कर्मचारी हा ट्रक सोडून देण्याच्या तयारीत होते असा आरोप करीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक जळगाव शहराजवळ अडवला. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर एपीआय सचिन बेंद्रे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. यानंतर दोन दिवसांनी काल शुक्रवारी रोहोम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदाचा पदभार किरणकुमार बकाले यांच्याकडे देण्यात आला आहे.

बचावासाठी रोहोम खडसेंच्या दारी..

या घटनेनंतर आज शनिवारी दुपारी तासभरापासून रोहोम एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर थांबून होते. दुपारी एक वाजता त्यांनी खडसे यांची भेट घेतली. अवघ्या पाच ते सहा मिनीटांच्या भेटीनंतर रोहोम खडसेंच्या दालनातून बाहेर पडत घरी निघून गेले. खडसेंनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त सतीष कुलकर्णी हे देखील खडसेंच्या घरी जाऊन आलेत. खडसेंचा बंगला आता सत्ताकेंद्र झाले आहे. खडसेंची प्रशासनावर आधीपासून चांगली पकड राहिली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे खडसेंच्या माध्यमातून रोहोम यांनी आपली व्यथा मांडल्याची चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.