ETV Bharat / state

भुसावळ : हवेत गोळीबार करून पळ काढणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक हे नियमित गस्त घालत असताना लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ पाच आरोपींना पोलिसांनी हटकले. त्यावेळी एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.

police arrest five accused who escaped by firing in air in bhusawal
भुसावळ : हवेत गोळीबार करून पळ काढणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Jan 17, 2021, 4:41 PM IST

जळगाव - पोलिसांना बघताच गोळीबार करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणार्‍या पाच गुन्हेगारांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. भुसावळ शहरातील लोणारी मंगल कार्यालयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. राजू बारे, भूषण यशवंत मोरे, विल्सन अलेक्झांडर जोसेफ (२७), सागर आनंदा पारधे (३०), ऑस्टीन शरद रामटेके (२१ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. हे सर्व जण हुडको कॉलनीतील रहिवासी आहेत.

गोळीबार करून काढला पळ -

भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक हे नियमित गस्त घालत असताना त्यांना लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ काही जण संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातील एकाने हवेत गोळीबार करून सर्वांनी तेथून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून यांना अटक केली.

हेही वाचा - महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल; एका व्यक्तीला मारल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.