ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणारी मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा आहे. या सभेत मोदी काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींची एरंडोल येथे जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता मोदी पहिल्यांदा जळगावात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींची धुळ्यात सभा झाली होती. तेव्हा जळगाव विमानतळावरून ते धुळ्याला रवाना झाले होते.

पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Oct 13, 2019, 7:52 AM IST

Updated : Oct 13, 2019, 11:45 AM IST

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात येत आहेत. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील विमानतळाजवळील मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सभेला काही वेळेतच सुरुवात होणार आहे.

जळगावात प्रचारसभेची तयारी, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणारी मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा आहे. या सभेत मोदी काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींची एरंडोल येथे जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता मोदी पहिल्यांदा जळगावात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींची धुळ्यात सभा झाली होती. तेव्हा जळगाव विमानतळावरून ते धुळ्याला रवाना झाले होते.

हेही वाचा - विधानसभेच्या निकालानंतर होणार एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा फैसला

मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी एनएसजी पथक तैनात आहे. त्याचप्रमाणे सभेच्या काळात जळगाव ते औरंगाबाद मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. इतरही मार्गांवरील वाहतुकीत बदल केलेले आहेत. पंतप्रधान मोदी ४ दिवसात ९ सभा घेणार आहेत.

हेही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ : राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Intro:जळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात येत आहेत. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील विमानतळाजवळील मैदानावर आज सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.Body:विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणारी मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा आहे. या सभेत मोदी काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींची एरंडोल येथे जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता मोदी पहिल्यांदा जळगावात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींची धुळ्यात सभा झाली होती. तेव्हा जळगाव विमानतळावरून ते धुळ्याला रवाना झाले होते.Conclusion:विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी एनएसजी पथक तैनात आहे. त्याचप्रमाणे सभेच्या काळात जळगाव ते औरंगाबाद मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. इतरही मार्गांवरील वाहतुकीत बदल केलेले आहेत.
Last Updated : Oct 13, 2019, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.