ETV Bharat / state

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी; देश हितासाठी केली दुवा

author img

By

Published : Jun 5, 2019, 4:06 PM IST

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. नमाज अदा केल्यानंतर देश हितासाठी दुवा देखील करण्यात आली.

जळगावात हर्षोल्हासात ईदचा सण साजरा

जळगाव - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. नमाज अदा केल्यानंतर देश हितासाठी दुवा देखील करण्यात आली.

देशवासीयांना ईद च्या शुभेछ्या देतांना ईदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष गफ्फार मलिक

शहरातील मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन ईदनिमित्त नमाज पठण केले. नमाज अदा केल्यावर मौलाना उस्मान साहब यांनी दुवा पठण केले. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारत देशात परस्परातील बंधुभाव वाढीस लागावा, देशात शांतता नांदावी, सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे बळीराजा आणि कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावे, भरपूर पर्जन्यमान व्हावे, अशी दुवा यावेळी मागण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह मैदानावर उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या.

परस्परात आनंदाची देवाणघेवाण -

वर्षातून दोनवेळा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील पहिल्या ईदला 'ईद-उल-फित्र' आणि दुसऱ्या ईदला 'ईद-उल जुहा' असे म्हटले जाते. 'ईद-उल-फित्र' हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ 'आनंद' आणि 'फित्र' म्हणजे दान करणे असा होय. पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात मुस्लीम बांधव रोजे म्हणजेच कडक उपवास करतात. रमजान महिन्यात जेव्हा चंद्र दर्शन होते त्याच्या दुसऱ्या दिवशी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परस्परात आनंदाची देवाणघेवाण करणे आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे, हे ईदच्या सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.

Intro:Feed send to FTP
(Slug : mh_eid celebration_vis_7205050)

जळगाव
शहरासह जिल्ह्यात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. नमाज अदा केल्यानंतर देश हितासाठी दुवा देखील करण्यात आली.Body:जळगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन ईदनिमित्त नमाज पठण केले. नमाज अदा केल्यावर मौलाना उस्मान साहब यांनी दुवा पठण केले. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या आपल्या भारत देशात परस्परातील बंधुभाव वाढीस लागावा, देशात शांतता नांदावी, सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे बळीराजा आणि कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावे, भरपूर पर्जन्यमान व्हावे, अशी दुवा यावेळी मागण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह मैदानावर उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या.Conclusion:परस्परात आनंदाची देवाणघेवाण-

वर्षातून दोनवेळा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील पहिल्या ईदला 'ईद-उल-फित्र' आणि दुसऱ्या ईदला 'ईद-उल जुहा' असे म्हटले जाते. 'ईद-उल-फित्र' हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ 'आनंद' आणि 'फित्र' म्हणजे दान करणे असा होय. पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात मुस्लीम बांधव रोजा म्हणजेच कडक उपवास करतात. रमजान महिन्यात जेव्हा चंद्र दर्शन होते; त्याच्या दुसऱ्या दिवशी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परस्परात आनंदाची देवाणघेवाण करणे आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे, हे ईदच्या सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.