ETV Bharat / state

दहावी शिकलेला व्यक्ती कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हा मोठा चमत्कार - पाशा पटेल - jalgoan

आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ, संशोधक, डॉक्टरेट असलेली व्यक्ती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेत. मात्र, पहिल्यांदाच घटनेचे पान फाडून तिथे दहावी शिकलेला व्यक्ती म्हणून आपण कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
author img

By

Published : Mar 3, 2019, 11:31 PM IST

जळगाव - आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ, संशोधक, डॉक्टरेट असलेली व्यक्ती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेत. मात्र, पहिल्यांदाच घटनेचे पान फाडून तिथे दहावी शिकलेला व्यक्ती म्हणून आपण कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो. हा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. रावेर येथे एका साप्ताहिकाच्या वतीने आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होणे ही बाब माझ्यासाठी चमत्कार आहे. कृषी मूल्य आयोगाची स्थापना करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. कर्नाटकनेही आपल्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष बंगळुरू कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुखांना केले होते. मी तर दहावी शिकलेला व्यक्ती होतो. त्यामुळे अध्यक्षाचे पान मी फाडले आणि तिथे दुसरे पान लावले, असेही पटेल यावेळी म्हणाले. या सोहळ्याला माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

Intro:जळगाव
आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अर्थतज्ज्ञ, संशोधक, डॉक्टरेट तसेच अर्थशास्त्र विषयात पंचवीस वर्षे अनुभव असलेली व्यक्तीचं राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालाय. मात्र, पहिल्यांदाच घटनेचे पान फाडून तिथं दुसरं पान जोडत दहावी शिकलेला व्यक्ती म्हणून आपण कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो. हा मोठा चमत्कार असल्याचे खळबळजनक वक्तव्य राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे कृषी सेवक या साप्ताहिकाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान सोहळ्यात पटेल यांनी हे वक्तव्य केलं.Body:पाशा पटेल म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होणं ही बाब माझ्यासाठी चमत्कार आहे. कृषी मूल्य आयोगाची स्थापना करणारं कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य. कर्नाटकनेही आपल्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष बंगळुरू कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुखांना केलं होतं. घटनेत अध्यक्ष कोण होतं तर एमएस्सी, पीएचडी. मी म्हटलं आपण तर मॅट्रिक पास आपण अध्यक्ष कसं व्हायचं. मग मी ती कर्नाटकची घटना आणली. त्यातलं अध्यक्षचं पान फाडलं आणि तिथं दुसरं पान लावलं, असेही पटेल म्हणाले.Conclusion:या सोहळ्याला माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.