ETV Bharat / state

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : युती न झाल्यास तिरंगी लढाईची शक्यता - पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ

पाचोरा विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यातच प्रमुख लढत होईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, या मतदारसंघात भाजपचे अमोल शिंदे हे देखील इच्छुक आहेत. यामुळे भाजप आणि सेनेत युती न झाल्यास येथे भाजप-सेना-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होऊ शकेल.

पाचोरा विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Sep 24, 2019, 4:37 PM IST

Updated : Sep 24, 2019, 8:58 PM IST

जळगाव - विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात आजी व माजी आमदारांमध्ये आरोप‌‌-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यातच प्रमुख लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात अमोल शिंदे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. भाजप आणि सेनेत युती झाली नाही तर शिंदे यांच्या उमेदवारीमुळे यावेळी भाजप-सेना-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

पाचोरा मतदारसंघाचा राजकीय इतिहास

पाचोरा-भडगाव मतदारसंघात के. एम. पाटील व ओंकार वाघ यांनी ४५ वर्षे राजकारण केले. सन १९९९ मध्ये प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून आर. ओ. पाटील यांनी ओंकार वाघ यांचा पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत आर. ओ. पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये आर.ओ. पाटील यांचे पुतणे किशोर पाटील यांनी युवा नेतृत्त्व म्हणून मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करीत दिलीप वाघ यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता.

या मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज्यात युती झाल्याने शिवसेनेने युती धर्म पाळत लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी आमदार किशोर पाटील यांचा दांडगा जनसंपर्क, पाच वर्षात केलेली विकासकामे, माजी आमदार कै. आर. ओ. पाटील यांच्याप्रती जनतेची असलेली सहानुभूती, तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे सोडविलेले प्रश्न, कै. ओंकार वाघ यांना मानणारा मोठा वर्ग अशा परिस्थितीत विधानसभेची लढाई रंगणार आहे.

हेही वाचा... जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंच्या पदरात नेमकं काय ?

मतदारसंघातील संभाव्य उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी पाचोऱ्यातून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपकडून अमोल शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत. प्रा. अस्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती सतीश शिंदे, माजी सभापती सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. एम. पाटील, बी. डी. पाटील, अमोल पाटील देखील इच्छुक आहेत.

मतदारसंघात प्रभावशील जातीय समीकरणे

या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, राजपूत, माळी, गुर्जर, बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते. मात्र, १९९९ व २००४ मध्ये आर. ओ. पाटील तर त्यांच्यानंतर २०१४ मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. किशोर पाटील हे आर. ओ. पाटील यांचे पुतणे आहेत.

भाजप-सेनेचे 'आस्ते कदम' राजकारण

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि सेनेने आपापल्या स्तरावर स्वबळाची चाचपणी केली आहे. मतदारसंघात पाचोरा-भडगाव नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती तसेच जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणात दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखी आहे. त्यामुळे युती होणे तसेच न होणे अशी शक्यता गृहीत धरून दोन्ही पक्षांनी स्वबळाची चाचपणी केली आहे. युतीच्या तहात हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. पण युती तुटली तर भाजप या ठिकाणी आपला उमेदवार देऊन सेनेची नाकेबंदी करेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

हेही वाचा... शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर ?​​​​​​​

हा मतदारसंघ सेनेचा असला तरी भाजपने जळगावात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आपण स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. युती तुटली तर भाजप याठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील किंवा अमोल शिंदे यांना रिंगणात उतरवू शकतो. २०१४ च्या निवडणुकीत किशोर पाटलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणारे शिंदे आता त्यांच्यापासून दुरावले असून त्यांनी भाजपची वाट धरली आहे. आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदे यांचे काका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांना जिल्हा बँकेच्या संचालक पदाची संधी नाकारल्याने अमोल शिंदे किशोर पाटलांवर नाराज आहेत. त्यांनी पाटलांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

  • नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्याची गरज

पाचोरा तालुक्यात १९९९ मध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उतावळी नदीचे पाणी बहुळात टाकण्याची योजना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रखडलेली आहे. केवळ २०० मीटर काम अपूर्ण राहिल्याने या वर्षीही उतावळीच्या पहिल्या पुराचे पाणी वाया गेले. हे काम पूर्ण झाल्यास पाचोरा शहरासह १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. सुमारे २५०० हेक्टर शेतीला पाणी मिळेल. मानसिंगका इंडस्ट्रीज बंद पडल्याने बेरोजगार तरूण रोजगाराची संधी शोधत आहेत.

हेही वाचा... कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार??

असा आहे पाचोरा मतदारसंघ

  • एकूण मतदार : ३ लाख ९,०७३
  • पुरुष मतदार : १,६१,४६५
  • महिला मतदार : १,४७,६०६

२०१४ च्या विधानसभेत कोणाला किती मतदान

  • किशोर पाटील : (शिवसेना) ८७,५२०
  • दिलीप वाघ : (राष्ट्रवादी) ५९,७११
  • उत्तमराव महाजन : (भाजप) २०,७७२
  • भाऊसाहेब पाटील : (काँग्रेस) ४,९०४

लोकसभेत भाजपला ७५ हजारांचे मताधिक्य

  • भाजप : १ लाख २०,५४८
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ४५ हजार ४३५

Intro:जळगाव
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पाचोरा-भडगाव मतदारसंघात आजी व माजी आमदारांमध्ये आरोप‌‌-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यातच प्रमुख लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात अमोल शिंदे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. भाजप आणि सेनेत युती झाली नाही तर शिंदे यांच्या उमेदवारीमुळे यावेळी भाजप-सेना-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल.Body:पाचोरा-भडगाव मतदारसंघात के. एम. पाटील व ओंकार वाघ यांनी ४५ वर्षे राजकारण केले. सन १९९९ मध्ये प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून आर. ओ. पाटील यांनी ओंकार वाघ यांचा पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत आर. ओ. पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये आर.ओ. पाटील यांचेे पुतणे किशोर पाटील यांनी युवा नेतृत्त्व म्हणून मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करीत दिलीप वाघ यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधे विळ्या-भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज्यात युती झाल्याने शिवसेनेने युती धर्म पाळत लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी आमदार किशोर पाटील यांचा दांडगा जनसंपर्क, पाच वर्षात केलेली विकासकामे, माजी आमदार कै. आर. ओ. पाटील यांच्याप्रती जनतेची असलेली सहानुभूती, तर दुसरीकडे दिलीप वाघ यांनी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे सोडविलेले प्रश्न, कै. ओंकार वाघ यांना मानणारा मोठा वर्ग अशा परिस्थितीत विधानसभेची लढाई रंगणार आहे.

संभाव्य उमेदवार असे-

विधानसभा निवडणुकीसाठी पाचोऱ्यातून शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ आणि भाजपकडून अमोल शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत. प्रा. अस्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती सतीश शिंदे, माजी सभापती सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. एम. पाटील, बी. डी. पाटील, अमोल पाटील देखील इच्छुक आहेत.

जातीय समीकरणे अशी-

या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, राजपूत, माळी, गुर्जर, बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येने आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते. मात्र, १९९९ व २००४ मध्ये आर. ओ. पाटील तर त्यांच्यानंतर २०१४ मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. किशोर पाटील हे आर. ओ. पाटील यांचे पुतणे आहेत.

भाजप-सेनेचे 'आहिस्ते कदम'-

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि सेनेने आपापल्या स्तरावर स्वबळाची चाचपणी केली आहे. मतदारसंघात पाचोरा-भडगाव नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती तसेच जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणात दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखी आहे. त्यामुळे युती होणे तसेच न होणे अशी शक्यता गृहीत धरून दोन्ही पक्षांनी स्वबळाची चाचपणी केली आहे. युतीच्या तहात हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. पण युती तुटली तर भाजप या ठिकाणी आपला उमेदवार देऊन सेनेची नाकेबंदी करेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मतदारसंघ सेनेचा असला तरी भाजपने जळगावात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आपण स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. युती तुटली तर भाजप याठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील किंवा अमोल शिंदे यांना रिंगणात उतरवू शकतो. २०१४ च्या निवडणुकीत किशोर पाटलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणारे शिंदे आता त्यांच्यापासून दुरावले असून त्यांनी भाजपची वाट धरली आहे. आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदे यांचे काका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांना जिल्हा बँकेच्या संचालक पदाची संधी नाकारल्याने अमोल शिंदे किशोर पाटलांवर नाराज आहेत. त्यांनी पाटलांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.

नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्याची गरज-

पाचोरा तालुक्यात १९९९ मधे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उतावळी नदीचे पाणी बहुळात टाकण्याची योजना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रखडली. केवळ २०० मीटर काम अपूर्ण राहिल्याने या वर्षीही उतावळीच्या पहिल्या पुराचे पाणी वाया गेले. हे काम पूर्ण झाल्यास पाचोरा शहरासह १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. सुमारे २५०० हेक्टर शेतीला पाणी मिळेल. मानसिंगका इंडस्ट्रीज बंद पडल्याने बेरोजगार रोजगाराची संधी शोधत आहेत.Conclusion:असा आहे मतदारसंघ-

एकूण मतदार : ३ लाख ९,०७३
पुरुष मतदार : १,६१,४६५
महिला मतदार : १,४७,६०६

२०१४ च्या विधानसभेत विजय कुणाला-

किशोर पाटील : (शिवसेना) ८७,५२०
दिलीप वाघ : (राष्ट्रवादी) ५९,७११
उत्तमराव महाजन : (भाजप) २०,७७२
भाऊसाहेब पाटील : (काँग्रेस) ४,९०४

लोकसभेत भाजपला ७५ हजारांचे मताधिक्य-

भाजप : १ लाख २०,५४८
राष्ट्रवादी काँग्रेस : ४५ हजार ४३५
Last Updated : Sep 24, 2019, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.