ETV Bharat / state

पाचोरा व भडगाव नगरपरिषद क्षेत्रात एका आठवड्याचा लॉकडाऊन; उद्यापासून अंमलबजावणी

जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शनिवारपासून या दोन्ही ठिकाणी 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

One week lockdown in Pachora and Bhadgaon municipal areas in jalgaon
पाचोरा व भडगावात नगरपरिषद क्षेत्रात एका आठवड्याचा लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 24, 2020, 4:15 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शनिवारपासून या दोन्ही ठिकाणी 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढले असून, उद्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे.

प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पारित केलेल्या आदेशानुसार, 25 जुलै रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 31 जुलैपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत 7 दिवस पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद क्षेत्रात कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक बाब म्हणून केवळ औषधांची दुकाने, दूध विक्री व खरेदी व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांना त्यांचा रहिवासाचा प्रभाग असणाऱ्या भागातच खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. हे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन घेवून जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातच ठोक व घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू राहणार आहेत.

पाचोरा व भडगाव नगरपरिषद क्षेत्रात राहणारे रहिवासी; ज्यांची शेती नगरपरिषद क्षेत्राबाहेर आहे, अशा शेतकऱ्यांना केवळ शेतीविषयक कामे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. औषधे बी-बियाणे, किटकनाशके, खत खरेदी करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला आपल्या शेतीचा सातबाराचा उतारा जवळ बाळगणे आवश्‍यक राहील. याशिवाय दोन्ही क्षेत्रातील सर्व आस्थापना, सर्व दुकाने बंद राहतील.

लग्नसमारंभ, अंत्ययात्रेला सशर्त परवानगी-
लॉकडाऊन कालावधीत लग्न समारंभासाठी 50 व्यक्ती उपस्थित राहू शकतील. याची परवानगी स्थानिक प्रशासन व पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. तर अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तीच उपस्थित राहू शकतील. दोन्ही नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल चालक व मालक यांना सूट देण्यात आलेली आहे. शासकीय वाहनांना शासकीय ओळखपत्र पाहून पेट्रोल-डिझेल विक्री करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.