ETV Bharat / state

रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला रिक्षाची धडक; कामावरून घरी परतणाऱ्या कामगार तरुणाचा मृत्यू

author img

By

Published : Sep 16, 2020, 12:01 AM IST

हा अपघात जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शहरातील हॉटेल त्रिमूर्तीसमोर सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी आज (मंगळवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातातील मृत एमआयडीसीतील एका कंपनीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.

जळगाव
जळगाव

जळगाव - रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर रिक्षा जाऊन आढळल्याने भीषण अपघात घडला. त्यात रिक्षातील एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून कामावरून घरी परतत होता. हा अपघात जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शहरातील हॉटेल त्रिमूर्तीसमोर सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी आज (मंगळवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

रवींद्र मधुकर जोशी (वय ४०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जोशी हा शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी होता. एमआयडीसीतील एका कंपनीत मोलमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. १४ सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे तो कामावरून घरी परतण्यासाठी रिक्षामध्ये (क्रमांक एमएच १९ व्ही ७५०१) बसला होता. अजिंठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनीकडे येत असताना हॉटेल त्रिमूर्तीसमोर रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर (एमएच ४१ जी ५२२९) रिक्षा आदळली. यात चालक दिनेश घोळके याच्यासह प्रवासी रवींद्र जोशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी जखमींना तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

उपचारादरम्यान झाला मृत्यू -

कोरोनामुळे जिल्‍हा सामान्य रुग्णालय शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याठिकाणी जखमींना दाखल करण्यात आले. मात्र, रवींद्र जोशी यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

हेही वाचा - जळगावचे माजी सैनिक सोनू महाजन साडेचार वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.