ETV Bharat / state

जळगावात भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; 1 ठार, 2 गंभीर - एकलग्न गावाजवळ अपगात

अपघातात ठार झालेले रमेश सोनवणे यांची एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे शेती आहे. ते जळगावातून ये-जा करत शेती करतात. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने ते जळगावातून मजूर नेऊन शेताची कामे करून घेत होते. आज ते कल्पनाबाई आणि शोभाबाई यांना कामासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी तिघे दुचाकीवरून घरी परतत होते. महामार्गावरुन येत असताना एकलग्न गावाजवळ मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

jal
मृत रमेश सोनवणे
author img

By

Published : Jan 8, 2020, 9:52 PM IST

जळगाव - भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने 1 जण ठार तर 2 जण जखमी झाले. ही घटना आज (8 जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली. रमेश दौलत सोनवणे (वय 45 रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. या अपघातात शोभाबाई कैलास पाटील (वय 35, रा. जळगाव) व कल्पनाबाई जगन राठोड (वय 36, रा. मंगलपुरी, जळगाव) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघातात ठार झालेले रमेश सोनवणे हे शेतकरी आहेत. त्यांची एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे शेती आहे. ते जळगावातून ये-जा करत शेती करतात. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने ते जळगावातून मजूर नेऊन शेताची कामे करून घेत होते. आज ते कल्पनाबाई आणि शोभाबाई यांना कामासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी तिघे दुचाकीवरून घरी परतत होते. महामार्गावरुन येत असताना एकलग्न गावाजवळ मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात रमेश सोनवणे यांच्यासह दोघी महिला खाली कोसळल्या. ट्रॅक्टरखाली आल्याने सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - चाळीसगाव-धुळे महामार्गावर डंपरची ट्रकला धडक, दोन्ही चालक गंभीर जखमी

त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या कल्पनाबाई राठोड व शोभा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी असलेल्या दोन्ही महिलांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच सोनवणे यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली. रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी सरला, मुलगा पंकज, मुलगी मोनाली व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Intro:जळगाव
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने 2 जण ठार तर 1 जण जखमी झाला. ही घटना आज (बुधवारी) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली.Body:रमेश दौलत सोनवणे (वय 45 रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) व कल्पनाबाई जगन राठोड (वय 36, रा. मंगलपुरी, जळगाव) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात शोभाबाई कैलास पाटील (वय 35, रा. जळगाव) ही महिला जखमी झाली आहे.

अपघातात ठार झालेले रमेश सोनवणे हे शेतकरी आहेत. त्यांची एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे शेती आहे. ते जळगावातून ये-जा करत शेती करतात. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने ते जळगावातून मजूर नेऊन शेताची कामे करून घेत होते. बुधवारी ते कल्पनाबाई आणि शोभाबाई यांना कामासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी तिघे दुचाकीवरून घरी परतत होते. महामार्गावरुन येत असताना एकलग्न गावाजवळ मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात रमेश सोनवणे यांच्यासह दोघी महिला खाली कोसळल्या. ट्रॅक्टरखाली आल्याने सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या कल्पनाबाई राठोड व शोभा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जास्त गंभीर असलेल्या कल्पनाबाई यांना खासगी रुग्णालयात हलवत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर शोभा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती कळताच सोनवणे यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली. कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. Conclusion:रमेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी सरला, मुलगा पंकज, मुलगी मोनाली व एक विवाहीत मुलगी आहे. तर कल्पनाबाई यांच्या पश्चात हातमजुरी करणारे पती व दोन मुले असा परिवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.