ETV Bharat / state

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

आज पुन्हा एकदा बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांची मोठी गर्दी उसळलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही. सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही अवलंब केलेला दिसून येत नाही, अशाने कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे.

no social distancing agricultural produce market committee in jalgaon
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
author img

By

Published : Feb 23, 2021, 10:05 AM IST

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाच्या लिलावाच्या वेळी आज पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. सोमवारी यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश बाजार समितीच्या सचिवांना दिले होते. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना नो एंट्री करण्यात आली होती. तर घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, बाजार समिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावले आहेत. आज पुन्हा एकदा बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांची मोठी गर्दी उसळलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही. सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही अवलंब केलेला दिसून येत नाही, अशाने कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

ही लॉकडाउनची लागण्याची शक्यता -

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी तसेच विक्रेते हे बेशिस्तपणे वर्तन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी हजारो लोकांची गर्दी उसळत असल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिली, तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढून लॉकडाउन लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. नागरिकांची बेफिकिरी घातक असून यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

हेही वाचा - अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला नक्षलवादी गुड्डू कुडयामी गडचिरोली पोलिसांच्या अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.