ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देणे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते - निलेश राणे

मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारमधील मंत्र्यांना विषय लक्षात येत नाही, एकही अभ्यासू व्यक्ती या सरकारमध्ये नाही. मराठा आरक्षणाचा विषय आता पेटत चालला आहे, तो आता थांबणार नाही. आजपर्यंत सरकार खोट बोलले, तेच त्यांच्या अंगाशी येत आहे. आरक्षण टिकले नाही. त्याला ठाकरे सरकार कारणीभूत आहे.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
author img

By

Published : Jun 7, 2021, 5:22 PM IST

Updated : Jun 7, 2021, 6:30 PM IST

जळगाव - मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते. जाणूनबुजून ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक बाजू मांडल्या नाहीत. जे मराठा आरक्षण फडणवीस सरकारने 5 वर्षे टिकवले, ते बिघडवण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आढावा घेण्यासाठी निलेश राणे हे राज्यात दौरा करत आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मराठा समाजाला एकत्र करुन तीव्र आंदोलन भाजपाच्या माध्यमातून उभे करणार असल्याचा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला आहे.

भाजपा नेते निलेश राणे

'सरकारमध्ये एकही अभ्यासू व्यक्ती नाही'

मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारमधील मंत्र्यांना विषय लक्षात येत नाही, एकही अभ्यासू व्यक्ती या सरकारमध्ये नाही. मराठा आरक्षणाचा विषय आता पेटत चालला आहे, तो आता थांबणार नाही. आजपर्यंत सरकार खोट बोलले, तेच त्यांच्या अंगाशी येत आहे. आरक्षण टिकले नाही. त्याला ठाकरे सरकार कारणीभूत आहे. वेगवेगळ्या राज्यांचे जे संदर्भ द्यायचे असतात, ज्या नोंदी द्यायच्या असतात, ते संदर्भ ठाकरे सरकारने आणि त्यांच्या वकिलांनी दिलेच नाहीत. कारण मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघटितपणे बैठकच घेतली नाही. अशोक चव्हाण हे समितीत असल्याने आरक्षण मिळणार नाही, ते न्यायालयाकडून नाकारले जाणार हे आम्हाला आधीच माहिती होते. ठाकरे सरकारने अहवालात मराठी भाषांतर केले पण ॲनेक्चरमध्ये केले नाही. जे न्यायाधीश बसले आहेत त्यांना काय मराठी वाचता येत नाही. म्हणून हे सारे जाणूनबुजून झाले आहे का? तर हो माझ्या मनात ही शंका नाही तर हे जाणूनबुजून झाले आहे. भोसले समिती बसली, त्यांनी आम्ही जे सांगत होतो, तेच सांगितले आहे. एकही वाक्य इकडे तिकडे नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही रिव्ह्यू टाकू शकत नाही, असे म्हटलेले नाही. रिव्ह्यू केंद्र सरकारने टाकला पण राज्य सरकारने अजूनपर्यंत टाकला नाही. आरक्षणासाठी मागास आयोग स्थापन करावा लागेल, हे सरकारच्या महिना दीड महिन्यापूर्वी लक्षात आले. मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो अहवाल राज्यपाल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे जातो. मग काय हवी ती घटनादुरुस्ती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही आहे, असे वाटत नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही माहिती नाही, अशातच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे, असे राणे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरेंना दिले थेट आव्हान

मराठा आरक्षणाच्या विषयातील कुठलाही तांत्रिक मुद्दा उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता स्पष्ट करावा, मी काहीही हरायला तयार आहे, असे थेट आव्हान निलेश राणेंनी यावेळी दिले. ठाकरे बोलूच शकत नाही, कारण त्यांचा अभ्यासच नाही. मराठ्यांना आरक्षण देणे त्यांच्या मनातच नाही. फक्त फिरवत बसवायचे, लटकवत ठेवायचे. हेच सरकार करत आहे. फडणवीसांनी जशी बाजू मांडली होती, तशी बाजू मांडली असती तर आज हा विषयच आला नसता, असेही त्यांनी सांगितले.

'महाधिवक्ता कुंभकोणी सुनावणीला जात नव्हते'

तेव्हाचे महाधिवक्ता कुंभकोणी हे सुनावणीलाच जात नव्हते, ते का जात नव्हते. अशा अनेक त्रुटी, बोगसपणा सरकारने केल्यामुळे आज मुडदे पडूनही मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही. हात पसरून झाले, आंदोलने करून झाली. आता मराठे तीव्र आंदोलन कधी करतील, याची वाट ठाकरे सरकार पाहत आहे. पण तो दिवसही दूर नाही. मराठे घरात घुसून तुमच्याकडून हक्काचे घेतील, हे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी लक्षात ठेवावे. अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत. भाजपा मराठ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभे करत आहे. त्याची पुढची रूपरेषा लवकरच कळेल, असेही निलेश राणे म्हणाले.

'संजय राऊत कोण, त्याला आम्ही महत्त्व देत नाहीत'

संजय राऊत काय म्हणतो, आम्ही त्याला कधीच महत्त्व दिले नाही. तो ठाकरेंच्या पगारावर आहे. बोलले नाही तर पगार मिळेल का त्याला सामनातून. संजय राऊत म्हणजे कोण, महाराष्ट्रासाठी काय केले? मराठ्यांचा अपमान केला. माफी मागितली नाही अजूनपर्यंत. तो हिशेब करू आम्ही नंतर, असेही राणेंनी सांगितले.

'संभाजीराजे यांनी पक्षाला विचारणा केलेली नाही'

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून भाजपाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. फक्त काही संघटना सोडल्या तर कोणताही पक्ष रस्त्यावर उतरलेला नाही. भाजपा सोडून कोणता पक्ष रस्त्यावर उतरला का? खासदार संभाजीराजे यांनी पक्षाला विचारून आंदोलनाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यांना पक्षाने खासदारकी दिली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाला विचारून काय ते करावे. पक्ष त्यांच्या विषयी योग्य निर्णय घेईल. आजपर्यंत काय केले? हे राजेंनी राज्य सरकारला विचारायला हवे. त्यांनी पहिला मोर्चा कलानगरला काढला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या - नवाब मलिक

Last Updated : Jun 7, 2021, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.