ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात 117 नवे कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 2971 वर - जळगाव कोरोना केसेस बातमी

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 117 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 2 हजार 971 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत 214 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात 117 नवे कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jun 26, 2020, 8:35 PM IST

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा 117 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 2 हजार 971 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे, शुक्रवारी कोरोनाबाधित असलेल्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 214 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 117 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 54, जळगाव ग्रामीण 3, अमळनेर 4, भुसावळ 6, भडगाव 21, चोपडा 3, धरणगाव 1, एरंडोल 1, जामनेर 2, पारोळा 4 तर रावेर येथील 8 रुग्णांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव शहरातील संसर्गाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. शुक्रवारी देखील अर्धशतकापेक्षा जास्त म्हणजेच 54 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगावातील रुग्णसंख्या 606 इतकी झाली आहे.

सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील 991 रुग्णांवर कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातही 124 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, आतापर्यंत 1 हजार 766 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी देखील 47 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूदेखील सुरूच आहेत. आतापर्यंत 214 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

शुक्रवारी 5 जणांचा मृत्यू -

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 64 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, भुसावळ येथील 81 वर्षीय वृद्ध तसेच धरणगाव तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषासह 65 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

शुक्रवारी 5 जणांचा मृत्यू -

जळगाव शहर 606
जळगाव ग्रामीण 95
अमळनेर 285
भुसावळ 390
भडगाव 163
बोदवड 38
चाळीसगाव 33
चोपडा 213
धरणगाव 126
एरंडोल 107
जामनेर 148
मुक्ताईनगर 25
पाचोरा 74
पारोळा 210
रावेर 215
इतर जिल्ह्यातील रुग्ण 10
एकूण रुग्णसंख्या 2971

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.