जळगाव- जिल्ह्यात गुरुवारी नवे २९२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ३०२ झाली आहे. गुरुवारी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण २९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर ८२, जळगाव ग्रामीण २०, अमळनेर १२, भुसावळ १८, बोदवड १९, चाळीसगाव १७, धरणगाव ४, एरंडोल १७, जामनेर ३३, मुक्ताईनगर ३१, पाचोरा १, पारोळा १४, रावेर ८ आणि यावल येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार ९१४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर ३ हजार ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी ९६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मृतांची संख्या ३०९ झाली आहे.
कोरोनाने ८ जणांचा मृत्यू-
गुरुवारी जिल्ह्यातील ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण चाळीशीहून अधिक वयाचे आहेत. जळगाव शहरातील ५६ वर्षीय पुरुष व ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जामनेर तालुक्यातील ५८ व ७० वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाचोरा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ५४ वर्षीय महिला व पारोळा तालुक्यातील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.