ETV Bharat / state

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या प्रतिमेला फासले काळे - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नायडूंचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा निषेध नोंदवण्यात आला.

ncp workers protest against naidu
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेंकय्या नायडूंच्या प्रतिमेला फासले काळे
author img

By

Published : Jul 23, 2020, 1:57 PM IST

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केलेल्या घोषणाबाजीला उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. गुरुवारी दुपारी याच विषयाचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेंकय्या नायडू यांच्या प्रतिमेला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी', अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी विरोध केला, असे कार्यकर्त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी वेंकय्या नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ऍड. कुणाल पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, भाजपचे नेते नेहमी जातीपातीचे राजकारण करत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असे यावेळी गफ्फार मलिक आणि अभिषेक पाटील यांनी सांगितले.

आंदोलकांना अटक व सुटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर सर्वांची कायदेशीर प्रक्रियेनंतर सुटका झाली. जिल्हापेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.