ETV Bharat / state

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी गिरीश महाजनांना फसवले, राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील यांचा घणाघात

जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. छाननी प्रक्रियेत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप भाजपने केला. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे.

Satish Patil answer bjp allegation
गिरीश महाजन फसवणूक स्मिता वाघ
author img

By

Published : Oct 24, 2021, 3:29 PM IST

जळगाव - जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून, आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. छाननी प्रक्रियेत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप भाजपने केला. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजपचे आरोप खोडून काढले आहेत.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील

हेही वाचा - जळगावात गुन्हेगारीचे उदात्तीकरण! जामिनावर सुटलेल्या आरोपीचे जंगी स्वागत करत काढली मिरवणूक

डॉ. सतीश पाटलांनी केले गंभीर आरोप

भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्यात आली. त्यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटलांनी गंभीर आरोप केले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले आहे. त्यामुळे, गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे. खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचे असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांची जिल्हा बँकेत उभे राहण्याची हिंमत झाली नाही, म्हणूनच जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवला, असा आरोपही डॉ. सतीश पाटील यांनी केला. माजी आमदार स्मिता वाघ यांनाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव आहे. असे असताना त्यांनी आपला अर्ज अपूर्ण ठेवणे संशयास्पद असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले.

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही -

भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने, भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांचे खंडन केले. भाजपच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसलेला नाही. वरिष्ठांच्या सूचनेवरून आम्ही भाजपसोबत जाणे टाळले. त्यामुळे, भाजपने उगाचच आकांडतांडव करू नये. आता स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने निवडणुकीत उतरावे, असे आव्हानही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले.

निवडणूक प्रक्रिया ही नियमानुसारच -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही सहकार कायद्यानुसार आणि निवडणुकीचे संकेत पाळूनच होत आहे. मात्र, आपले पानिपत होणार असल्याची पूर्वकल्पना असल्यानेच भाजपकडून आरोपांच्या फैरी सुरू आहेत, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करणाऱ्या भाजपसोबत का जावे, असा आमचा सवाल असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - भाजपकडून ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न, जळगाव दौऱ्यात आमदार रोहित पवारांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.