ETV Bharat / state

भुसावळमध्ये अज्ञात तरुणाचा निर्घृण खून; चाकूने वार केल्यानंतर दगडाने ठेचला चेहरा

author img

By

Published : Jul 17, 2021, 9:05 AM IST

Updated : Jul 17, 2021, 9:59 AM IST

श्रद्धा कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी सकाळी काही नागरिक दररोजप्रमाणे दर्शनासाठी आले. त्यावेळी अज्ञात तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असल्याने, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.

अज्ञात तरुणाचा निर्घृण खून
अज्ञात तरुणाचा निर्घृण खून

जळगाव - गुन्हेगारीच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे भुसावळ शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील जामनेर रस्त्यावरील श्रद्धा कॉलनीत असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ गुरुवारी रात्री एका अज्ञात तरुणाचा निर्घृणपणे खून झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी तरुणाच्या अंगावर आधी चाकूने वार केले आहेत. त्यानंतर मृत तरुणाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे.

भुसावळमध्ये मर्डर

अशी समोर आली घटना
श्रद्धा कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी सकाळी काही नागरिक दररोजप्रमाणे दर्शनासाठी आले. त्यावेळी अज्ञात तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असल्याने, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चेहरा ठेचल्याने ओळख पटवण्यात अडचणी
खून झालेल्या तरुण हा 32 ते 35 वयोगटातील आहे. मारेकऱ्यांनी त्याच्या अंगावर चाकूने वार केलेले असून, चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवून घेतले. मृत तरुणाची ओळख व्हावी म्हणून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यासंदर्भात कुणाला काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अज्ञात तरुणाचा निर्घृण खून
अज्ञात तरुणाचा निर्घृण खून

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय
या घटनेसंदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, खून झालेल्या तरुणाची ओळख अस्पष्ट आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तरुणाचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. मारेकऱ्यांनी अतिशय क्रूर पद्धतीने चाकूने वार करून खून केल्याचे दिसत आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी यावेळी वर्तवला.

हेही वाचा - मध्य प्रदेश विहीर दुर्घटना : ३० तासांनी बचावकार्य संपले; मुलासह ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

Last Updated : Jul 17, 2021, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.