ETV Bharat / state

जळगावात आढळले कोरोनाचे 106 नवे रुग्ण, एकूण बाधितांंची संख्या 2 हजार 589 - जळगावातील कोरोनाबाधितांची संख्या

जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 106 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 37, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 4, अमळनेर 4, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 3, यावल 8, एरंडोल 15, जामनेर 3, रावेर 5, पारोळा 17 तर इतर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे.

new corona cases in jalgaon
जळगावातील कोरोनाबाधितांची संख्या
author img

By

Published : Jun 23, 2020, 9:54 PM IST

Updated : Jun 23, 2020, 10:05 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक हा जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात एकट्या जळगाव शहरात कोरोनाचे 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या पाचशेच्या पुढे गेली. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी 106 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 589 इतकी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 106 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 37, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 4, अमळनेर 4, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 3, यावल 8, एरंडोल 15, जामनेर 3, रावेर 5, पारोळा 17 तर इतर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. त्यातल्या त्यात जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर, चोपडा, रावेर आणि पारोळा याठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे. जळगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे आहे. तर, भुसावळात चारशे, अमळनेरात तीनशे तसेच चोपडा, रावेर आणि पारोळ्यात दोनशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -

जळगाव शहर - 501
जळगाव ग्रामीण - 79
भुसावळ - 370
अमळनेर - 268
चोपडा - 198
पाचोरा - 55
भडगाव - 113
धरणगाव - 115
यावल - 121
एरंडोल - 92
जामनेर - 126
रावेर - 187
पारोळा - 184
चाळीसगाव - 26
मुक्ताईनगर - 17
बोदवड - 36
इतर जिल्ह्यातील - 11
एकूण रुग्ण संख्या - 2 हजार 589

Last Updated : Jun 23, 2020, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.