ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक लोकांना होऊन गेला कोरोना; 'सेरो' सर्वेक्षणातून उघड - हर्ड इम्युनिटी जळगाव

कोरोना संसर्गाचा वेग आणि त्याची तीव्रता तपासण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यक परिषदेच्या म्हणजेच 'आयसीएमआर'च्या वतीने ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. दुसऱ्या सर्वेक्षणात आधी झालेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत दुप्पट तपासण्या करण्यात आल्या होत्या.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 10, 2020, 4:27 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन ते कोरोनातून पूर्णपणे बरे देखील झालेले आहेत. परंतु, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने ही बाब लक्षात आली नाही. कोरोनावर मात केल्यानंतर जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. आता 'हर्ड इम्युनिटी'मुळे या लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती खूपच कमी आहे. भारतीय वैद्यक परिषदेतर्फे करण्यात आलेल्या 'सेरो' सर्वेक्षणात यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ही बाब आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने दिलासादायक मानली जात आहे.

कोरोना संसर्गाचा वेग आणि त्याची तीव्रता तपासण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यक परिषदेच्या म्हणजेच 'आयसीएमआर'च्या वतीने ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. दुसऱ्या सर्वेक्षणात आधी झालेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत दुप्पट तपासण्या करण्यात आल्या होत्या.

माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, जामनेर तालुक्यातील गोराडखेडे त्याचप्रमाणे भुसावळ शहरातील वॉर्ड क्रमांक ४५, जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक ५७, तसेच चाळीसगाव शहरातील वॉर्ड क्रमांक २८ अशा कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांहून लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला आहे. अहवालात जिल्ह्यातील २५.९ टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूशी लढणाऱ्या पेशी म्हणजेच अँटिबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्ह्यातील निम्म्या लोकांना कोरोनाची लागण?

जळगाव जिल्ह्यात दुसरा सेरो सर्वे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला होता. त्यावेळी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार एवढी होती. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. कोरोनाची रुग्णसंख्या २४ हजार इतकी असताना झालेल्या सेरो सर्वेक्षणाचा अहवाल आता आला आहे. त्यात २५.९ लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या सर्वेक्षणानंतर वाढलेल्या कोरोना संसर्गाचे गणित लक्षात घेतले तर लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाणही दुप्पट झाले असावे, असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येत अँटिबॉडीज तयार झाल्याचा आरोग्य यंत्रणेचा अंदाज असून, ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

हार्ड इम्युनिटी म्हणजे काय?

एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती विषाणूवर हल्ला चढवून त्यांना मारून टाकतात. रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असल्यास विषाणूचा फैलाव होऊन प्रादुर्भाव होतो. परंतु, अँटिबॉडीज सक्षम तयार झाल्यास त्या विषाणूचा नायनाट करतात. अँटिबॉडीज तयार झालेल्या व्यक्तीवर पुढील काही दिवस विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

दरम्यान, हर्ड इम्युनिटीसाठी किमान ५० टक्के अँटिबॉडीज आवश्यक असतात. एखाद्या विषाणूचा संसर्ग सुरू असेल तर त्यावर मात करण्यासाठी अँटिबॉडीजचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांहून अधिक आवश्यक असते. तसे असल्यास त्याला हर्ड इम्युनिटी मानले जाते. हर्ड इम्युनिटी तयार झाली म्हणजे, पुन्हा विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

दक्षता घेणे गरजेचेच..

दरम्यान, सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी भविष्यात दक्षता घेणे गरजेचे असल्याचे देखील डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, तो एकमेकांच्या संपर्कात आल्याने अधिक वाढण्याची भीती असते. अमेरिकेतही आता कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येते. त्यामुळे, आपल्याकडेही ती येऊ शकते. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा- रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना अखंडीत वीजपुरवठा करा - गुलाबराव पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.