ETV Bharat / state

जळगाव वसतिगृहातील मुलींचा विनयभंग; विधानसभेत पडसाद, चौकशी समिती नियुक्त - जळगाव वसतिगृहातील मुलींचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यातील एका महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगावातील महिला वसतिगृहात महिलांना नग्न करून नाचायला लावण्यात येणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा मुद्दा भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत लावून धरला. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात समिती नेमून दोषी असणाऱ्यांवर करत कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं.

Molestation of girls in Jalgaon hostel
Molestation of girls in Jalgaon hostel
author img

By

Published : Mar 3, 2021, 8:32 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील एका महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संघटनांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला.

गृहमंत्र्यांचे विधानपरिषदेत निवेदन -

जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावले. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

दोषींवर कडक कारवाई - यशोमती ठाकूर

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर माझ्या विभागाकडून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

जळगाव प्रकरणावर बोलताना मंत्री यशोमती ठाकूर

सर्वत्र संतप्त पडसाद -

जळगाव जिल्ह्यातील संबंधित वसतिगृहात पोलिसांनी महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत नाचायला लावले. हा प्रकार अतिशय गंभीर असून शासकीय वसतिगृह असल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत व याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय होती हे कळणे गरजेचे आहे, अशी मागणी विधान परिषद शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि प्रसाद लाड यांनी केली. तसेच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून त्यात सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधी यांचा देखील समावेश करण्याची मागणी केली.

चौकशीसाठी चार जणांची समिती -

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून न्याय व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. या समितीत मॅगेसेस पुरस्कार विजेत्या निलीमा मिश्रा आणि महिला कार्यकत्या वासंती दिघे यांच्या नेमणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, शासकीय समितीत बाहेरील सदस्यांची नेमणूक होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणी त्यांचे मत विचारात घेता येईल असे सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण -

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संघटनांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाचे पडसाद सभागृहात उमटले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल -

वसतिगृहात दोन महिलांमधील वाद व वसतिगृहातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नेमले आहे. त्यात एक महिला अधिकारी, पोलीस अधिकारी, दोन तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. चौकशीत जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हे - पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सांगितले की, शहरातील वसतिगृहातील प्रकाराची वरिष्ठ महिला अधिकारी चौकशी करीत आहे. जी महिला व्हिडिओत सांगते आहे ते नेमके कोणाबद्दल ते कळत नाही. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली आहे. चौकशीत जे समोर येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. वरिष्ठांना देखील याची माहिती देण्यात येणार आहे.

दोषींवर कठोर शिक्षा करा- पंकजा मुंडे

जळगाव येथील सरकारी वसतिगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचाराची घटना अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असल्याचे समजते. यातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

विधानसभेत पडसाद -

जळगावातील महिला वसतिगृहात महिलांना नग्न करून नाचायला लावण्यात येणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा मुद्दा भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत लावून धरला. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात समिती नेमून दोषी असणाऱ्यांवर करत कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. मात्र राज्यात अशा प्रकारच्या घटना होत आहेत राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे का नाही ? त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र या मागणीवर आक्षेप घेत हे वाक्य पटलावरून काढण्याची विनंती करण्यात आल्यानंतर हे वाक्य पाटलांना काढण्यात आलं. मात्र राज्यात कायदा-सुव्यवस्था याचा बोजवारा उडालाय अशी खंत भाजप आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण -

जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली. १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.