ETV Bharat / state

'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अमळनेरातील परिस्थिती हाताबाहेर' - स्मिता वाघ लेटेस्ट न्यूज

अमळनेरातील बाधितांची संख्या शुक्रवारी 69 होती. त्यात शनिवारी सकाळी पुन्हा 31 रुग्णांची भर पडली असून, रुग्णसंख्या 100 वर पोहचली आहे.

'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अमळनेरातील परिस्थिती हाताबाहेर'

author img

By

Published : May 9, 2020, 5:39 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचे 'हॉटस्पॉट' असलेल्या अमळनेर शहरात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. सद्यस्थितीत अमळनेरात 100 बाधित रुग्ण असून त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळेच अमळनेरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा आरोप विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी केला आहे.

जळगावातील निवासस्थानी अमळनेरातील गंभीर परिस्थितीविषयी चर्चा करताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अमळनेर शहरातील 31 व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या शंभरावर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण 157 कोरोनाबाधितांपैकी 100 बाधित एकट्या अमळनेरातील असून हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत स्मिता वाघ पुढे म्हणाल्या, अमळनेर शहरात सुरुवातीला साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याचा मुलगा पुण्याहून घरी आलेला होता. त्याच्यापासून दाम्पत्याला लागण झाल्याचा संशय आहे. या दाम्पत्याला कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 18 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात महिलेला श्‍वसनाचा त्रास अधिक होत असल्याने तिचा 19 एप्रिलला मृत्यू झाला होता. तोवर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नव्हता. या महिलेचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे कारण सांगून जळगाव महापालिकेने तसा मृत्यू दाखला देत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी रात्रभर घरात ठेवत रितीरिवाजानुसार विधी केले. नंतर तिच्या अंत्ययात्रेत अनेक नातेवाईक सहभागी झाले होते. पुढे चुकीमुळे अमळनेरवर कोरोनाचे संकट ओढवले. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर एवढी बिकट परिस्थिती ओढवली नसती, असेही आमदार वाघ म्हणाल्या.

प्रशासन उपाययोजना करण्यात कमी पडत आहे -

अमळनेर शहराची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. मात्र, अजूनही या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. दुसरीकडे, राज्य सरकारदेखील कोरोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करत असल्याचे सांगत आहे. परंतु, राज्य सरकारच्या उपाययोजना स्थानिकांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले.

रुग्ण वाढण्याची भीती -
अमळनेर शहरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे या ठिकाणी समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अमळनेरातील बाधितांची संख्या शुक्रवारी 69 होती. त्यात शनिवारी सकाळी पुन्हा 31 रुग्णांची भर पडली असून, रुग्णसंख्या 100 वर पोहचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.