जळगाव : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे मागील आठवड्यात एका 19 वर्षीय नराधमाने एका सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारल्याचा प्रकार घडला. यावेळी या आरोपीला जिल्हा पोलीस दलाने तात्काळ अटक केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले. यावेळी भडगावच्या गोंडगावातही पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी भडगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
-
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
">पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद : यावेळी पीडितेच्या आई-वडिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. आरोपीला कठोर शिक्षा होऊन तो खटला जलद गतीने पुढे कसा नेता येईल, याबद्दल पोलिसांशी बोलणे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. पाचोरा येथील स्थानिक पत्रकारांनी त्यांच्या वृत्तांकनातून मुख्यमंत्री यांनी कुठलाही ठोस असा शब्द दिला नाही, त्यांनी सर्वांसमोर फोनवर संवाद साधून 'फक्त चमकोगिरी'च केली, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले. यानंतर आमदार किशोर पाटील यांनी स्वतः पत्रकार संदीप महाजन यांना फोनवरून संवाद साधत अश्लील शिवीगाळ केली.
आमदार किशोर पाटील यांचे स्पष्टीकरण : व्हायरल झालेल्या फोनवरील संवादाच्या ऑडिओ क्लिप संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. त्यात राज्य सरकार योग्य ती कारवाई तातडीने करत आहे. परंतु संबंधित पत्रकाराने चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्याला शिवीगाळ केल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, जे केले ते सत्य सांगण्याची हिंमत ठेवतो, असे ते म्हणाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा पत्रकारांनी आमदार किशोर पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पत्रकारांच्या विरोधात हे वक्तव्य नाही. त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी बोललो आहे. अख्ख्या भारतातल्या पत्रकारांना मी अंगावर घ्यायला मूर्ख नाही, असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
जीवाला धोका : यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिसांना दिली होती. मात्र, त्यांच्याकडून मला कुठलेही संरक्षण मिळाले नाही. माझ्यावर किशोर पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. किशोर पाटील समर्थकांनी माध्यमातून भर रस्त्यात मारहाण केली, याचा व्हिडिओ सर्व पत्रकार व जनतेवर दबाव टाकण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटातर्फे निषेध : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला आमदारांनी ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर शिवीगाळ केली, याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निषेध करतो. तर संदीप महाजन यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना तात्काळ न्याय मिळावा. तसेच फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांच्या वृत्तांकनातून केली होती. मात्र याचा राग आल्याने आमदार किशोर पाटील यांनी अश्लील शिवीगाळ केली, या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वतः पाचोरा दौऱ्यावर येत आहेत. तोपर्यंत या खटल्यातील आरोपीला शिक्षा नाही झाली, तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री यांना घेराव घालू, असा इशाराही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी दिला आहे.
हेही वाचा :