ETV Bharat / state

खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक - जळगाव मुलीवर अत्याचार न्यूज

संदीप तिरामली याने ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिच्या अवस्थेवरून ही घटना उघड झाली.

minor girl physical abused in jalgaon, Accused arrested
खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक
author img

By

Published : Jan 4, 2021, 1:28 PM IST

Updated : Jan 4, 2021, 3:08 PM IST

जळगाव - खाऊचे आमिष दाखवून एका ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३७ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. संदीप सुदाम तिरामली (वय ३७, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप तिरामली याने ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील एका ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिच्या अवस्थेवरून ही घटना उघड झाली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित संदीप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी...
आरोपीला मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक-या घटनेनंतर संशयित संदीपने गावातून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना केली होती. सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पोलीस शिपाई शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक केली.

यापूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा-
संशयित आरोपी संदीप याने २०१२ मध्ये एका चिमुरडीवर अशाच पद्धतीने अत्याचार केला होता. या गुन्ह्यात ७ वर्षांची शिक्षा भोगून तो २ महिन्यांपूर्वीच बाहेर आला आहे. त्यानंतर आता पुन्हा त्याने असेच कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा - जळगाव : आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप

हेही वाचा - भादलीच्या 'त्या' तृतीयपंथीला न्यायालयाचा दिलासा; स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारीला मिळाली मान्यता

Last Updated : Jan 4, 2021, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.